Kolhapur : शहरासह जिल्ह्यात जुगार अड्ड्यांची चलती

पोलिसांसमोर आव्हान; दिवाळी बोनसही डावावर लागण्याची कुटुंबांना चिंता
jugar bases
jugar basessakal media
Updated on

कोल्हापूर : दिवाळीचा बोनसच नव्हे, तर महिन्याचा ॲडव्हान्स पगार तरी घरी येईल की नाही, याची चिंता अनेक कुटुंबांना लागून राहिली आहे. सणासुदीच्या दरम्यान जुगार अड्ड्यांची चलती हे त्यामागचे कारण आहे. शहरासह जिल्ह्यात छुपे जुगार अड्डे सुरू आहेत हे महिन्याभरातील पोलिसांच्या कारवाईतून पुढे येत आहे. शेतवडीसारख्या निर्जन स्थळी एखाद्या झाडाचा आधार घ्यायचा, एखाद्या भाडेतत्वावरील घरात अगर हॉटेलमध्ये रूम घेऊन तेथे पत्त्यांचा डाव मांडायचा अशी स्थिती आहे. कारवाईच्या दृष्टीने ही ठिकाणे असुरक्षित असल्याने आता काळेधंदेवाल्यांनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

शहर, गावापासून दूर अंतरावरील निर्जन स्थळी एक छोटे शेड मारायचे, येथे येणाऱ्या सर्व मार्गांवर पगारी माणसं पेरायची, त्यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा सातत्याने कानोसा घ्यायचा, शंका आली तर डाव मोडून तेथून सहीसलामत पळून जाण्याचा नवा फंडा काळेधंदेवाल्यांनी वापरण्यास सुरवात केली आहे.

महिन्यात मार्केट यार्ड येथील एका हॉटेलच्या रूममध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. १५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. करवीर तालुक्यातील एका गावाच्या हद्दीत असणाऱ्या झाडाखाली सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर १० ऑक्टोबरला करवीर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत १३ जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. शिरोळ तालुक्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडूनही एक लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दिवाळी सणात सर्वसामान्यांच्या हातात बोनस, ॲडव्हान्स पगारासह भिशीचे पैसे येतात. त्यावर काळेधंदेवाल्यांचा डोळा असतो. या काळात छुपे जुगार अड्ड्यांचे प्रमाण वाढते. जिंकण्याच्या हव्यासापोटी व्यसनाधीनतेमुळे सणात दिवाळे निघते. अशा जुगार अड्ड्याच्या जाळ्यात घरचे कोणी अडकू नये अशी धास्ती सर्वसामान्यांना लागून राहते. असे अड्डे शोधून काळेधंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

सर्वसामान्यांच्या अपेक्षा...

  • सणाच्या काळातील जुगार अड्डे शोधून काढा

  • निर्जन स्थळांच्या ठिकाणी गस्त वाढवा

  • कारवाईत सातत्य ठेवा

  • रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वॉच ठेवा

जानेवारी ते जुलैअखेरचे जिल्ह्यातील चित्र

प्रकार दाखल गुन्हे उघड गुन्हे

जुगार ४०३ ४०३

दारू कारवाई १८६५ १८६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.