Kolhapur: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी कारवाई; न्यायालयाने दिले आदेश

...म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर नामुष्कीची वेळ
kolhapur collector office court order take action
kolhapur collector office court order take action
Updated on

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावर नामुष्कीची वेळ आली आहे. (kolhapur collector office court order take action )

मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाडमधील जमिनी वादाच्या प्रकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेल्यानं न्यायालयाने हे आदेश देण्यात आले आहेत. १९८४ पासून हा खटला चालू होता. आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत.

सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

न्यायालयाने लेल्या आदेशानूसार खुर्च्या, लॅपटॉप, वाहन जप्त करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी व वकील देवराज मगदूम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.

kolhapur collector office court order take action
BJP Politics: 'उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला पण अजित पवारांसोबत...' भाजपच्या जेष्ठ नेत्याचं सुचक विधान

नेमकं काय आहे प्रकरण?

कुरुंदवाड येथील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा दावा न्यायालयात दाखल हाेता. हा दावा कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ यांनी दाखल केला हाेता. कुरुंदवाड येथील रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संकपाळ यांची जमीन घेतली होती.

जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने संकपाळ यांनी न्यायालयाचे सन 1984 मध्ये दरवाजे ठाेठावले हाेते. दरम्यान प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे काढले आहे अशी माहिती संकपाळ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.