Sharad Pawar : 'शाहू महाराजांना राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची आवड, ते कधीच राजकीय भूमिका घेत नाहीत'

'शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची आवड आहे. राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्याचा वारसा ते चालवत आहेत.'
Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharaj
Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharajesakal
Updated on
Summary

'शाहू महाराज कधीही राजकीय भूमिका घेत नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षात ते गेले हे कधी मी पाहिलेले नाही.'

कोल्हापूर : ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Loksabha Constituency) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या नावाची चर्चा माझ्या तर कानावर आलेली नाही, मी इतक्या वर्षांपासून इथे येतोय; पण अशी चर्चा कधी ऐकली नाही. मात्र, तशी चर्चा असेल तर आघाडीतील इतर लोकांशी मी बोलेन, कोल्हापूरकरांची हीच भावना असेल तर व्यक्तीशः मला आनंदच होईल,’ अशी गुगली टाकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या उमदेवारीचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला.

Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharaj
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांबरोबर..

कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या (Govind Pansare Memorial) लोकार्पण कार्यक्रमासाठी श्री. पवार आज कोल्हापुरात होते. कोल्हापुरात येताच त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेसला भेट दिली. त्यावेळी या दोघांत दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी (Sharad Pawar) संवाद साधला.

‘राजर्षी शाहू महाराजांनी पुण्यात बसवलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी छत्रपती घराण्यातील कोणी तरी येते. त्याठिकाणी माझी भेट होईल असे वाटले होते; पण ती भेट न झाल्याने आज शाहू महाराज यांच्या भेटीसाठी आलो असल्याचे श्री. पवार म्हणाले. ‘इथे आल्यानंतर ठरलेल्या वेळी आमची भेट झाली नाही, याचे आश्‍चर्य वाटले. कारण असे कधी होत नाही. मात्र, माहिती घेतल्यानंतर शाहू महाराज हे उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यंकाप्पा भोसले यांना भेटण्यासाठी गेले होते. यावरून राजर्षी शाहू महाराजांचा विचार ते आजही चालवतात’, अशा शब्दांत पवार यांनी शाहू महाराजांचे कौतुक केले.

Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharaj
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, श्रीनिवास पाटलांना आव्हान..

‘शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची आवड आहे. राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्याचा वारसा ते चालवत आहेत. ते कधीही राजकीय भूमिका घेत नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षात ते गेले हे कधी मी पाहिलेले नाही; पण तुम्ही (पत्रकार) म्हणताय तशी चर्चा असेल आणि कोल्हापूरकरांचीही तीच भावना असेल तर मला आनंदच होईल, असे सांगत पवार यांनी थेट उमेदवारीबाबत भाष्य करण्याचे टाळले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, माजी आमदार राजीव आवळे उपस्थित होते.

आकडा सांगताना सुधारणा करावी

‘महायुतीकडून राज्यात ‘४५ प्लस’ तर देशात ‘४०० पार’चा नारा दिला जात असल्याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘देशात लोकसभेच्या जागा किती, महाराष्ट्रात किती? देशातील ५४३ आणि राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा महायुती जिंकणार असे त्यांनी म्हणावे. महायुतीच्या नेत्यांनी पुढच्यावेळी हा आकडा सांगताना सुधारणा करावी’, असा टोला पवार यांनी लगावला.

Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharaj
Loksabha Election : मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? म्हणाले, 'मी उमेदवार असेन की नाही हे..'

शाहू महाराजांकडून लढण्याचे संकेत

‘माझ्या उमेदवारीबाबतचा निर्णय महाविकास आघाडीतील इतर पक्षांतील नेत्यांशी चर्चा करून होईल. माझ्या बाबतीत काही नकारात्मक दिसत नाही’, असे सांगत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. ते श्री. पवार यांच्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

३९ जागांवर एकमत

‘राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या बैठकीत ३९ जागांवर एकमत झाले आहे. येत्या दोन दिवसांत अन्य जागांचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होतील. लवकरच अंतिम जागा वाटप व उमेदवारीचा निर्णय जाहीर केला जाईल’, असे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharaj
Loksabha Election: 'सांगली, हातकणंगलेतून प्रतीकसाठी चाचपणी'; जयंत पाटलांचे नव्या मांडणीचे संकेत, शेट्टींच्या मतदारसंघात एन्ट्री?

मराठा आरक्षण टिकेल का?

‘‘यापूर्वी दोनवेळा मराठा समाजाला आरक्षण दिले. एकदा उच्च न्यायालयात टिकले; पण सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. मागील वेळी दिलेला आरक्षणाचा बहुंताशी मसुदाच यावेळीही घेतला आहे. त्यामुळे यावेळी देखील न्यायालयात आरक्षण टिकेल का? हे सांगता येणार नाही’, असे पवार म्हणाले. तर, मनोज जरांगे-पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यावर आताच भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()