गणपतराव पाटील यांच्या भूमिकेवरच ठरणार चित्र

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी शिरोळ तालुक्यात सध्या पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला आहे
केडीसीसीचे रणांगण : गणपतराव पाटील यांच्या भूमिकेवरच ठरणार चित्र
केडीसीसीचे रणांगण : गणपतराव पाटील यांच्या भूमिकेवरच ठरणार चित्र
Updated on

जयसिंगपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी शिरोळ तालुक्यात सध्या पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान संचालक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विरोधात दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यात लढतीचे प्राथमिक चित्र असले तरी गणपतराव पाटील यांच्या भूमिकेवरच बिनविरोध लढतीचे चित्र अवलंबून असेल.

तालुक्यात क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सुरूवातीच्या काळात दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पथदर्शी प्रकल्प राबविला. जयसिंगपूर-उदगाव बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला. त्याआधी त्यांनी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी केला, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अकरा टक्के व्याज दराने या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांना कर्ज दिले. पहिल्या टप्प्यात २७ गावांच्या क्षारपड जमीन सुधारणेच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाठबळ मिळाल्याने शेतकऱ्यांनी अल्प व्याज दरातील कर्ज घेऊन प्रत्यक्ष क्षारपड जमीन सुधारणा कार्याला सुरुवात केली.

गणपतराव पाटील, यड्रावकर यांच्यामुळे तालुक्यातील क्षारपड जमीन मोठ्या प्रमाणावर पिकाखाली येत आहे. ऊस पट्टा अशी विशेष ओळख असणाऱ्या तालुक्यात पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याने ऊस आणि इतर पिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी सध्या क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेऊन यात शेतकऱ्यांना सक्षम बनविले आहे. यामुळे क्षारपड जमीन सुधारणा या मुद्यावर भर देत हे दोघे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरतील असा अंदाज आहे.

दृष्टिक्षेपात तालुका

विद्यमान संचालक राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर

पात्र संस्था - ५५६

कृषी पत, विकास सेवा आदी - १४९

प्रक्रिया संस्था - ५७

नागरी बँक, पतसंस्था - ११४

पाणीपुरवठा व इतर - २३६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()