पूर्ववैमनस्यातून पोलिस खबऱ्याचा निर्घृण खून; डोक्यात रॉड घातला अन् नंतर बीअरच्या बाटल्या फोडून पोटात खुपसल्या

Hatkanangle Railway Bridge Murder : अनोळखी तिघा हल्लेखोरांनी प्रथम त्याच्या डोक्यात रॉड घातला. त्यानंतर बीअरच्या बाटल्या फोडून त्या त्याच्या पोटात खुपसल्या.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

हल्ल्यात विनायक गंभीर जखमी झाला. त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते. याची माहिती समजताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली.

हातकणंगले : पूर्ववैमनस्यातून येथे एका पोलिस खबऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला. येथील हातकणंगले रेल्वे पुलाजवळील (Hatkanangle Railway Bridge) एका बीअरबारमध्ये हा प्रकार घडला. त्यात विनायक महादेव बजयंत्री उर्फ कोरवी (वय ४२, रा. पाच तिकटी, हातकणंगले) याचा मृत्यू झाला. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

अनोळखी तिघा हल्लेखोरांनी प्रथम त्याच्या डोक्यात रॉड घातला. त्यानंतर बीअरच्या बाटल्या फोडून त्या त्याच्या पोटात खुपसल्या. हल्ल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. कामगार ठेक्याच्या वर्चस्वातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Kolhapur Crime
पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला, पाच ते सहा मारेकऱ्यांच्या हल्ल्यात पत्नीही जखमी

याबाबत हातकणंगले पोलिसांनी (Hatkanangale Police) दिलेली माहिती अशी : विनायक आणि तिघा हल्लोखारांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता. आज रात्री साडेदहाच्या सुमारास हातकणंगले-इचलकरंजी रस्‍त्‍यावर असलेल्‍या एका बीअर बारमध्‍ये संशयित तिघांनी विनोदला बोलावून घेतले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. ती विकोपाला जाताच तिघेही त्याच्या अंगावर धावून गेले. हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या डोक्यात रॉडने प्रहार केला. तोंडावरही घाव घातले. त्याच्या पोटात बीअरच्या बाटल्या खुपसल्या.

हल्ल्यात विनायक गंभीर जखमी झाला. त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते. याची माहिती समजताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, फरार संशयितांच्या हालचालींचा तपास सुरू केला आहे. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे. पोलिसांनी तपासासाठी पथके नेमली आहेत.

Kolhapur Crime
Kolhapur : चांदी उद्योजकाचा हुपरीत निर्घृण खून; छातीत धारदार शस्राने वार, खुनानंतर 25 किलो चांदीचे दागिने गायब

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. विनायकची पोलिस खबऱ्या म्हणूनही ओळख होती. तो काही काळापासून पोलिसांसाठी माहिती देत होता आणि त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे स्थानिक गुन्हेगारांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याच्या खुनामागे त्याच्या या भूमिकेचा संबंध असण्याच्‍या शक्यतेची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.