सख्खा भाऊ पक्का वैरी! 'त्या' चांदी उद्योजकाचा भावानेच केला खून; वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद, मित्रालाही अटक

Kolhapur Crime : पंचतारांकित एमआयडीसीमधील सिल्व्हर झोनमध्ये राहणाऱ्या ब्रह्मनाथ हालुंडे यांचा रविवारी खून झाला होता.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

प्रवीणचा ब्रह्मनाथशी वडिलांनी कमावलेल्या चांदीच्या वाटणीवरून सतत वाद होत असे. प्रवीण जात असलेल्या व्यापाराच्या ठिकाणी जाऊन ब्रह्मनाथ आपला चांदी माल पुरवठा करीत होता.

हुपरी : येथील चांदी उद्योजक ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. प्लॉट सी-१३, सिल्व्हर झोन) यांच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत लावला. वडिलोपार्जित चांदी वाटणीच्या कारणातून सख्या भावानेच मित्राच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. प्रवीण सुकुमार हालुंडे (२८, रा. वाळवेकरनगर, हुपरी) व आनंद शिवाजी खेमलापुरे (२२, रा. श्री चौक शिवाजीनगर, हुपरी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ब्रह्मनाथ यांच्या दुकानातून चोरलेली सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीची दहा किलो चांदी, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सुकुमार कल्लाप्पा हालुंडे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पंचतारांकित एमआयडीसीमधील सिल्व्हर झोनमध्ये राहणाऱ्या ब्रह्मनाथ हालुंडे यांचा रविवारी खून झाला होता. घरामध्ये एकटाच असलेल्या ब्रह्मनाथ यांच्या खुनाविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. पोलिसांनी शिताफीने तपास करून रविवारी रात्रीच ब्रह्मनाथ यांचा धाकटा भाऊ प्रवीण याला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Kolhapur Crime
Kolhapur : चांदी उद्योजकाचा हुपरीत निर्घृण खून; छातीत धारदार शस्राने वार, खुनानंतर 25 किलो चांदीचे दागिने गायब

त्याच्याकडे चौकशी करताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. आपला मित्र आनंद खेमलापुरे याच्या मदतीने हा खून केल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आनंद खेमलापुरेला रायबाग (कर्नाटक) येथून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, हुपरीचे पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, गोकुळ शिरगावचे दिगंबर गायकवाड, शिरोली एमआयडीसीचे सहायक निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली.

ब्रह्मनाथच्या छाती, पोट, दंडावर हत्याराने वार

प्रवीणचा ब्रह्मनाथशी वडिलांनी कमावलेल्या चांदीच्या वाटणीवरून सतत वाद होत असे. प्रवीण जात असलेल्या व्यापाराच्या ठिकाणी जाऊन ब्रह्मनाथ आपला चांदी माल पुरवठा करीत होता. तो राग मनात धरून प्रवीणने ब्रह्मनाथचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार संशयित प्रवीणने मित्र आनंद खेमलापुरे याला सोबत घेतले. दोघे रविवारी दुपारी ब्रह्मनाथच्या दुकानात गेले. तेथे प्रवीणचा ब्रह्मनाथबरोबर वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या प्रवीणने ब्रह्मनाथला पकडून धरले तर खेमलापुरेने ब्रह्मनाथच्या छाती, पोट व दंडावर जोरदार हत्याराने वार केले. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. दरम्यान, या गुन्ह्यातील हत्यार पोलिसांना अद्याप सापडलेले नाही.

Kolhapur Crime
पूर्ववैमनस्यातून पोलिस खबऱ्याचा निर्घृण खून; डोक्यात रॉड घातला अन् नंतर बीअरच्या बाटल्या फोडून पोटात खुपसल्या

सख्खा भाऊ पक्का वैरी...!

संशयित प्रवीण हा ब्रह्मनाथ याचा लहान सख्खा भाऊ होता. प्रवीण विवाहित तर ब्रह्मनाथ अविवाहित होता. दोघेही चांदी व्यावसायिक स्थिरस्थावर होते; पण त्यांच्यात वडिलांच्या मालमत्तेचा वाद पेटला आणि तो त्यांना विनाशाकडे नेणारा ठरला. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीचा या निमित्ताने प्रत्यय आल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.