Kolhapur Dam Update : काळम्मावाडीत जास्त, तर राधानगरीत कमी पाणीसाठा; कोल्हापुरातील 'या' 8 धरणांत किती आहे पाणी?

गेल्यावर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणात कमी तर, काळम्मावाडी (Kalammawadi Dam) जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Kalammawadi Radhanagari Dam
Kalammawadi Radhanagari Damesakal
Updated on
Summary

सध्या असणारे ढगाळ वातावरणामुळे शेतीसाठी लागणारा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये जास्त आणि काही धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणात कमी तर, काळम्मावाडी (Kalammawadi Dam) जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राधानगरी धरणात (Radhanagari Dam) १.५६ टीएमसी, तर काळम्मावाडी धरणात १.६६ टीएमसी पाणीसाठा होता. आज राधानगरीमध्ये १.५६ तर काळम्मावाडी धरणात २.६९ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवेल, अशी परिस्थिती होती.

दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात झालेला वळीव पाऊस तसेच, सध्या असणारे ढगाळ वातावरणामुळे शेतीसाठी लागणारा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये जास्त आणि काही धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला आहे. हे पाणी जपून वापरले पाहिजे, असे आवाहन केले जात होते. आता मॉन्सूनपूर्व (Monsoon) वातावरण होत आहे.

Kalammawadi Radhanagari Dam
आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत येऊ शकतो महापूर? CM शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

मॉन्सूनची शक्यता लवकरच असल्याने हा साठा पूर्ण क्षमतेने पुरवून उरेल, असे चित्र आहे. यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी होईल, असाही अंदाज व्यक्त केला होता. मात्र, वेळोवेळी झालेल्या वळीव पावसाचा आधार मिळाला आहे. शेतीला या पावसाचा भरपूर फायदा झाला आहे. यामुळे नदीतील पाणी उपसा कमी होण्यास मदत झाली आहे.

Kalammawadi Radhanagari Dam
धबधब्याजवळ 'या' 43 वर्षांच्या अभिनेत्रीचा हाॅट अंदाज; सेल्फी घेत दिल्या किलर पोज

धरण गेल्यावर्षीचा पाणीसाठा यावर्षीचा पाणीसाठा TMC मध्ये

  • राधानगरी १.६४ १.५६

  • तुळशी १.०४ १.१३

  • वारणा ७.५३ ४. ६२

  • दूधगंगा १.६६ २.६९

  • कासारी ०.५७ ०.८१

  • कडवी ०.८७ १.१४

  • कुंभी १.१० १.१०

  • पाटगाव ०.८८ १.२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.