इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा प्रदूषित झाले असून त्याचा फटका जलचरांना बसत आहे. प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने माशांचा तडफडून मृत्यू होत आहे. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या विविध उपाययोजना कूचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे पंचगंगा नदीपात्रात मृत मासे आढळले होते. बावड्यातही दूषित पाण्यामुळे मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.(Kolhapur panchganga dead fish in Ichalkaranji)
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमच चर्चेत राहिला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्यांचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसून येत नाही. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिना संपला की नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह थांबतो. नदीपात्रात विविध उद्योगांसह अनेक शहरांतील मैलायुक्त सांडपाणी मिसळते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात होते. गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रातील पाणी काळपट झाले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे.
प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्सिजन घेण्यासाठी मासे पाण्याच्या वरच्या पातळीवर येत आहेत. तर काही मासे ऑक्सिजनअभावी मृत होत आहेत. असे मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची नदी काठावर गर्दी होत आहे. आता सुरुवात झाली असून पुढील एक - दोन दिवसांत मासे मृत होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
''पंचगंगा नदीत मासे मृत झाल्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत. आवश्यकता वाटल्यास खबरदारी म्हणून पंचगंगा नदीतून करण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करण्यात येईल.''
- सुभाष देशपांडे, जल अभियंता, इचलकरंजी पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.