Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात ३९ हजार ६३३ नवमतदार; एकूण ३७ लाख ५८ हजार ५१३ मतदारांची नोंदणी

लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. यामध्ये शनिवार (ता. १६) पर्यंत जिल्ह्यात ३७ लाख ५८ हजार ५१३ मतदारांची नोंदणी झाली आहे.
Kolhapur district has 39633 new voters total registration of 3758513 voters lok sabha election
Kolhapur district has 39633 new voters total registration of 3758513 voters lok sabha electionSakal
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. यामध्ये शनिवार (ता. १६) पर्यंत जिल्ह्यात ३७ लाख ५८ हजार ५१३ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये १८ लाख ९७ हजार ३५६ पुरुष मतदार असून, १८ लाख २५ हजार ५९८ महिला मतदार आहेत. तसेच १८० तृतीयपंथीय व्यक्तींची नोंद झाली आहे.

यंदा १८ ते १९ वयोगटांतील ३९ हजार ६३३ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या आचारसंहितेची माहिती देण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. गेल्या २४ तासांत शासकीय कार्यालयातील सर्व राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती काढण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक परिसरातील राजकीय पक्षांच्या जाहिरातील काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत.

यापुढे राजकीय पक्षांना कोणताही उपक्रम परवानगी घेऊन करावा लागेत. तसेच त्याची नोंद निवडणुकीच्या खर्चामध्ये करण्यात येईल. उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी तसेच विविध रॅली बैठकांसाठी अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतच्या इतर जिल्ह्यांतून तसेच गोवा व कर्नाटक राज्यातून दारूची अवैध वाहतूक होण्याची शक्यता विचारात घेऊन पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्तरावर नाकेबंदी करण्यात येऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

यासंबंधित दोन्ही विभागांकडून तत्काळ कार्यवाही सुरू केली जाणार आहे. यासंबंधाने कोणाला गोपनीय माहिती द्यावयाची असल्यास अशी माहिती पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील १९५० क्रमांकावर माहिती देण्यात यावी.

त्याचे नाव व क्रमांक गोपनीय ठेवण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. तसेच विविध प्रकारची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. मतदारांनी निर्भयपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावावा.’ पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.

निवडणूक यंत्रणेचा आढावा

  • १८ नोडल अधिकारी

  • ४४४ क्षेत्रीय अधिकारी

  • ३ हजार ३५९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी

  • ७ हजार ११४बॅलेट युनिट

  • ५ हजार ४८ कंट्रोल युनीट

  • ४ हजार ९०६ व्हीव्हीपॅट

हातकणंगले मतदारसंघ आढावा

मतदारसंघ -मतदान केंद्रे -पुरुष -स्त्री - तृतीयपंथी - एकूण

  • शाहूवाडी - ३३३- १ लाख ५१ हजार ८९४ -१ लाख ४१ हजार ७६२- ३ -२ लाख ९३ हजार ६५९

  • हातकणंगले- ३३१ -१ लाख ६८ हजार ७८६ -१ लाख ६० हजार ९४१ -१८ - ३ लाख २९ हजार ७४६

  • इचलकरंजी -२५५ -१ लाख ५२ हजार ८४२ -१ लाख ४५ हजार ३९६ - ६० -२ लाख ९८ हजार २९८

  • शिरोळ - २९३ -१ लाख ५७ हजार ६२५- १ लाख ५७ हजार २५२- २ - ३ लाख १४ हजार ८७९

  • इस्लामपूर -२८४ -१ लाख ३६ हजार ८७४ - १ लाख ३२ हजार २३३ -४ -२ लाख ६९ हजार १११

  • शिराळा - ३६४ -१ लाख ५१ हजार ६२४ -१ लाख ४३ हजार ८८२ -४ -२ लाख ९५ हजार ५१०

  • एकूण -१८६० -९ लाख १९ हजार ६४६ -८ लाख ८१ हजार ४६६- ९१ -१८ लाख १ हजार २०३

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ मतदार आढावा

मतदारसंघ- मतदान केंद्र संख्या- पुरूष- स्त्री -तृतीयपंथी -एकूण

  • चंदगड -३८१ -१ लाख ५८ हजार ९७४ -१ लाख ५७ हजार २१८ -८ -३ लाख १६ हजार २००

  • राधानगरी- ४२५ -१ लाख ७२ हजार ३८४- १ लाख ६० हजार ३६१ -१४- ३ लाख ३२ हजार ७५९

  • कागल -३५४- १ लाख ६४ हजार ७३७ -१ लाख ६२ हजार ८३७ -५ -३ लाख २७ हजार ५७९

  • कोल्हापूर दक्षिण -३२८ -१ लाख ७५ हजार ५४२ -१ लाख ६९ हजार ०७२ -४५ -३ लाख ४४ हजार ६५९

  • करवीर - ३५७- १ लाख ६२ हजार ०७३- १ लाख ४८ हजार ६८५ -० -३ लाख १० हजार ७५८

  • कोल्हापूर उत्तर - ३११ -१ लाख ४४ हजार- १ लाख ४५ हजार ९५९ - १७ -२ लाख ८९ हजार ९७६

  • एकूण - २१५६ -९ लाख ७७ हजार ७१० -९ लाख ४४ हजार १३२- ८९ -१९ लाख २१ हजार ९३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.