पहिल्या, दुसऱ्या लाटेचा तडाखा; जिल्‍हा १०० टक्‍के बाधित

covid 19
covid 19covid 19
Updated on

कोल्‍हापूर : कोरोनाने (covid 19) जिल्‍ह्याच्या कानाकोपऱ्यात धडक दिली आहे. जिल्‍ह्यातील सर्व १०२५ गावात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्‍ण सापडले आहेत. एकही गाव किंवा वाडी, वस्‍ती कोरोनामुक्‍त राहिलेली नाही. जिल्‍ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भूदरगड, चंदगड (Shahuwadi, Gaganbawda, Radhanagari, Bhudargad, Chandgad)हे डोंगरी तालुके असूनही या तालुक्यांच्या कानाकोपरयातही कोरोना पोहोचला आहे. जी गावे पहिल्या लाटेत कोरोनामुक्‍त होती, ती दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्त झाली आहेत. कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबवण्याकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने दुसऱ्या लाटेचा कहर सुरुच आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही व्यक्‍त केला जात आहे. त्यामुळे संभाव्य लाटेला थांबवण्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे.(kolhapur-district-is-100-percent-covid-19-affected-kolhapur-news)

जिल्‍ह्यात दीड वर्षापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेत कोरोनाला रोखण्यासाठी गावोगावी कोरोना प्रतिबंधात्‍मक समित्या स्‍थापन झाल्या. गावं, गल्‍ल्या, रस्‍ते कोरोनाच्या धास्‍तीने बंद झाले. चाकरमाने कामधंदा सोडून मिळेल त्या वाहनाने गावात दाखल झाले. जिल्‍ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे ५ लाखांवर लोक जिल्‍ह्यात दाखल झाले. तरीही निम्‍म्याहून अधिक जिल्‍ह्यात कोरोना पोहोचला. पहिली लाट ओसरु लागल्यानंतर जनजीवन पदावर येवू लागले असतानाच दुसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे.

कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. ग्रामीण भागात तर शहरापेक्षा भयावह परिस्‍थिती आहे. गाव, गल्‍ल्या, वाड्याच नव्‍हे तर धनगरवाड्यांवरही कोरोना पोहोचला. गावागावातही बाधित रुग्‍ण, त्यांचे नातेवाईक दाद देत नसल्याने, सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी होत असल्यानेही कोरोना प्रतिंबधात्‍मक उपाययोजनांवर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम रुग्‍णसंख्या वाढीवर झाला आहे. पहिल्या लाटेत ज्या पध्‍दतीने गावांनी साथ दिली, समित्या सक्रीय राहिल्या तशी परिस्‍थिती दुसऱ्या लाटेत राहिलेली नाही.

जिल्‍ह्यातील सर्व गावे किंवा त्यांच्या वाड्या वस्‍त्यात कोरोना पोहोचला. एकही गाव कोरोनामुक्‍त राहिलेले नाही. यातच तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. कोणतीही कमरता राहू नये, यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. सर्व ग्रामपंचायतींना सुचना दिल्या जात आहेत. प्रत्‍येग गावावर व गावातील रुग्‍णांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

- अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()