कोल्हापुरात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम; हे राहणार सुरु, हे बंद

निवासी उपजिल्हाधिकारी; दुकाने, आस्थापना सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरु
कोल्हापुरात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम; हे राहणार सुरु, हे बंद
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (kolhapur district) दुसरी लाट अजून ओसरलेली नाही. तसेच तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस (व्हेरिएंट) (delta plus) विषाणूंच्या संसर्गाचा मोठा धोका संभवत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानूसार कोल्हापूर जिल्ह्यात दुकाने, आस्थापना, कृषि व कृषिपूरक सेवा देणारी दुकाने, व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर, सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. चार नंतर जिल्ह्यात संचारबंदी असेल.

लग्नसमारंभासाठी 25 व्यक्ति व अंत्यविधीसाठी 20 लोकांचाच समावेश ठेवण्यात येईल. तर, मैदाने, सार्वजनिक ठिकाणी, फिरणे, सायकलींग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश आजपासून कायम राहतील अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाची बैठक झाली. यामध्ये या सर्वांचा उहापोह झाला. यावरून जिल्ह्यातील निर्बंध पूर्वीप्रमाणे जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार आज निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी जिल्ह्यासाठी प्राधिकरणाच्या निर्णयाचा आदेश आज जाहीर केला.

कोल्हापुरात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम; हे राहणार सुरु, हे बंद
Good News - महालक्ष्मी एक्स्प्रेस 1 जुलै; नागपूर 2 पासून धावणार

आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या बैठकीत झालेल्या चर्चेत, राज्यात काही भागात डेल्टा प्लस (व्हेरिऐंट) विषाणूंचे संक्रमण वाढत आहे. कोल्हापूर शेजारी असणाऱ्या रत्नागिरीसह, (ratnagiri) जळगाव (jalgaon) आणि इतर जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस विषाणूंचे रुग्ण आढळले आहेत. याचा कोल्हापूर जिल्ह्याला धोका संभवतो. असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी (corona positivity) प्रमाण सरासरी 10 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे अजूनही कोल्हापूर चौथा स्तरातच आहे. यापार्श्‍वभूमीवर 5 जूनला दिलेले आदेश जैथे ठेवण्याचा निर्णय घेतला.

आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या बैठकीतील चर्चा

कोल्हापूर जिल्ह्यात 18 जून 2021 ते 24 जून 2021 दरम्यान एका आठवड्यात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची सरासरी टक्केवारी 16.07 टक्के आहे. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या स्तरामध्ये कोल्हापूर अजूनही चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय, जिल्ह्याच्या सिमा भागात म्हणजेच रत्नागिरीमध्ये कोरोना विषाणूचा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करणे गरजेचे आहे. त्यानूसार जिल्ह्यातील निर्बंधाना शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तसे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आदेश जारी करावेत.

प्राधिकरणाच्या बैठकीत संसर्ग रोखण्यासाचे नियोजन

  • लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरणासाठी पात्र 70 टक्के लोकांना लस देणे. कामाचा ठिकाणी (ब्लू कॉलर कामगार) कामगारांना लस देणे.

  • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्ती-जास्त चाचण्या घेणे व उपचार करणे.

  • आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशी आणि दंडात्मक कारवाई करावी

  • सभा, मेळावे, उपक्रम घेण्यास मज्जाव

  • लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉलच्या ठिकाणी तपसाण्या कराव्यात

कोल्हापुरात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम; हे राहणार सुरु, हे बंद
कोकण : मंडणगडच्या 52 गावांत कोरोनाची एंट्री

हे सुरु राहणार

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवशी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत

  • वृत्तत्रे, त्यांचे वितरण व्यवस्था

  • हॉटेलमधील पार्सल सेवा

  • सार्वजनिक मैदाने,उद्याने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद ठेवावी

  • लग्नसमारंभ 25 व्यक्ति, अत्यविधी 20 व्यक्ति असाव्यात

  • कृषी कामे, कृषी दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत

  • सलून व जिम 50 टक्के क्षमतेने

  • बससेवा 50 टक्के क्षमतेने

  • ई कॉमर्स फक्त अत्यावश्‍यक सेवा

  • कामगार निवास व्यवस्था असलेली बांधकाम

हे बंद राहणार

  • अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने

  • सिनेमा गृह, मॉल

  • सर्व प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम

अत्यावश्‍यक सेवा

  • रुग्णालये, रोग निदान केंद्र, क्‍लिनिक्‍स, लसीकरण केंद्र, विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती, लस, सॅनिटायझर तयार करणारे, वैद्यकीय उपकरणे.

  • शासकीय व खाजगी पशुवैधकीय सेवा, दवाखाने, ऍनिमल केअर सेंटर, व पेट फुड शॉप

  • वनीकरण कामकाज

  • विमान कंपन्या, विमानतळी, देखभाल दुरुस्ती

  • किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रते, दुध, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने

  • शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम

  • विमानसेवा, रेल्वे, टॅक्‍सी, ऑटोरिक्षा, सर्वाजनिक बसेस

  • मान्सून पर्व उपक्रम व कामे

  • रिर्झव्ह बॅंकेने दिलेल्या अत्यावश्‍यक सेवा

  • दुरसंचार सेवा

  • मालाची वाहतूक

  • पाणी पुरवठा विषयक सेवा

  • शेती संबंधीत सर्व कामकाज आणि शेती विषयक कामगार अखंडीत सुरु राहण्यासाठी शेतीपूरक सेवा

  • पेट्रोल पंप

कोल्हापुरात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम; हे राहणार सुरु, हे बंद
PHOTO - कोल्हापूर जिल्ह्यातील रोप लावणीची लगबग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.