कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी निवास

बाजार समितीची सुविधा चांगली; तरीही अल्प प्रतिसाद, केलेला खर्च वाया
 Kolhapur Market Yard
Kolhapur Market Yardsakal
Updated on

कोल्हापूर : परराज्यातून किंवा परजिल्ह्यातील शेतमाल घेऊन अनेक शेतकरी शाहू मार्केट यार्डात येतात. अडत्याकडे शेतीमाल उतरल्यानंतर शेतकऱ्यांना थंडी वाऱ्यात, उकाड्यात रात्र काढावी लागते. अशा शेतकऱ्यांना अल्प दरात निवासाची सुविधा बाजार समितीने केली. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्याकडे शेतकरी, वाहतूकदारांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, बाजार समितीने केलेल्या सुविधेचा खर्च वाया जात असून शेतकऱ्यांना समजवावे कसे? प्रश्न बाजार समितीसमोर आहे.

राज्याच्या विविध भागांतून शेतीमाल घेऊन रात्री अपरात्री शेतकरी शाहू मार्केट यार्डात येतात. अर्धा ते एक तासात गाडीतील शेतीमाला अडत्याच्या गोदामात उतरून घेतला की, सौदे सकाळी सात वाजता सुरू होतात ते दहा वाजता किंवा दुपारी संपतात. यावेळेत शेतकरी शेतीमाला शेजारी थांबून राहतात. अशीच अवस्था वाहतूकदारांचीही असते.

अशा शेतकरी, वाहतुकदारांसाठी शेतकरी निवासाची सुविधा बाजार समितीने केली आहे. अवघ्या ५० रुपयात येथे शेतकऱ्यांना राहता, येणे शक्य आहे. मात्र, अनेक शेतकरी शेतीमाल शेजारी थांबून राहतात गाडीत झोपून राहतात. सकाळी आंघोळीपासून नैसर्गिकविधी आवरावे कोठे? असा प्रश्न पडतो. यासाठी बाजार समितीने शेतकरी निवासाची सुविधा केली. त्याची माहिती देणारा फलक मार्केट यार्डात लावला आहे. तरीही शेतकरी किंवा वाहतूकदार नगण्य संख्येने या सुविधेचा लाभ घेतात. वास्तविक १२ वर्षांपासून ही सुविधा सुरू आहे. येथे शौचालय व बाथरूमसह स्वतंत्र खोली हॉल व कॉटेज अशा स्वरूपातील सुविधा आहेत. येथे शेतीमाल उतरल्यानंतर सौदा होईपर्यंत लाभ घेता येतो. तरीही रात्री थंडीत कुडकुडत शेतकरी रात्र बाहेरच काढतात.

शेतकऱ्यांना तसेच शेतीमाल वाहतूकदारांना रात्रीच्या निवासाचा सोय चांगल्या प्रकारे केली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, याबाबतची माहिती फलक ही बाजार समिती आवारात लावला आहे.

- जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती.

शेतमाल उतरल्यानंतर तो उघड्यावर सोडून अन्यत्र राहायला जाता येणे अशक्य होते. शेतीमालाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे ठरते. त्यामुळे शेतकरी निवासात अनेक शेतकरी राहायला येत नाहीत, अशी दुहेरी समस्या आहे. काही शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.