कोल्हापूर : पहिल्याच पावसात पडले ४७ वृक्ष

विदेशी झाडांचे उन्मळून पडण्याचे प्रमाण अधिक; केवळ ८ देशी वृक्ष
Tree Falling reference image latest news
Tree Falling reference image latest newsesakal
Updated on

कोल्हापूर : शहरात २ जूनला सोसाट्याचा वारा सुटला होता, पाऊसही झाला. यामध्ये ४७ वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये केवळ ८ वृक्ष हे देशी प्रजातींचे होते. तर तब्बल ३९ वृक्ष हे विदेशी होते. त्यातही महापालिकेच्या मालकीची झाडे अधिक होती. प्रशासनाने सजग राहून वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. तरच शहरातील वृक्षसंपदा बहरेल.

महापालिका प्रशासन, सामाजिक संघटना आणि तालीम संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली. शहरात ५० ते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडेही आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सोसाट्याचा वारा सुटला की वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वृक्षांच्या भोवती डांबरीकरण केले जाते. रस्ता करताना हे प्रकार घडतात. त्यामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. पर्यायाने मुळे कमकुवत होतात आणि वाऱ्याने झाडे पडतात. तसेच वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करताना समतोल राखला गेला नाही. तरीही एका बाजूला भार पडल्याने झाडे पडतात.

देशी प्रजातींची लागवड करा

विदेशी वृक्ष येथील प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पडण्याचे प्रमाण अधिक असते. यासाठी देशी प्रजातींची लागवड अधिक प्रमाणात केली पाहिजे. जागा उपलब्ध असल्यास दाटीवाटीने झाडे लावता येतील. तर दोन वृक्षांच्या फांद्या एकमेकांना आधार देतात. त्यामुळेही वृक्ष वाऱ्यात तग धरू शकतात. तरच शहरातील वृक्षसंपदा टिकू शकेल.

२ जूनला वाऱ्याचा वेग अधिक होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष पडले. पडलेल्या वृक्षांमध्ये विदेशी प्रजातींची संख्या अधिक आहे. केवळ ८ देशी प्रजातींचे वृक्ष पडले आहेत. स्थानिक प्रजाती प्रतिकूल वातावरणातही टिकाव धरतात हे यातून दिसून येते. नवीन झाडे लावताना देशी प्रजातींना प्राधान्य दिले पाहिजे.

उन्मळून पडलेल्या विदेशी प्रजाती

स्पॅथोडिया, रेन्ट्री, सिल्वर ओक, गुलमोहर, आकाशनिम, बदाम, निलगिरी, गिलोशिडीया, सुबाबूळ, भद्राक्ष

अशी घ्यावी काळजी...

झाडांना अळी करावीत खोडाभोवती काँक्रिटीकरण, डांबरीकरण नको छाटणी करताना समतोलपणे करावी योग्य जागा निवडावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()