पुरामुळे 47 हजार 891 हेक्टर क्षेत्रांतील पिकांचे नुकसान, 1 लाखांवर शेतकऱ्यांना फटका; पूरनुकसानीचे 122 कोटी जमा

Kolhapur Flood : जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Floodesakal
Updated on
Summary

पूरनुकसानीचे १२२ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले आहेत. आत्तापर्यंत २५ कोटी रुपये वाटप केले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलैत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे (Kolhapur Flood) जिल्ह्यातील ४७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्रांतील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांना (Farmers) फटका बसला. दरम्यान, शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईची १२२ कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली आहे. तहसीलदारांच्या माध्यमातून आत्तापर्यंत २५ कोटी रुपये निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे.

जुलै महिन्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा (Panchganga and Dudhganga River) या चार नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी व ओढ्याच्या काठासह सुमारे बारा हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पूरामुळे सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्यात झाले आहे.

Kolhapur Flood
दलित कुटुंबासोबत राहुल गांधींनी घेतला जेवणाचा आस्वाद; 'त्या' जेवणाचे घेतले नमुने, महत्त्वाची माहिती आली समोर

दरम्यान, जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. ४० हजार ३०० हेक्टर बागायती पिकांचे आणि ३७ हेक्टरवरील फळबागा पिकांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात १० हजार हेक्टर आणि हातकणंगले तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. करवीर ७ हजार ६८७, कागल २ हजार ४५३, राधानगरी १ हजार ४७८, गगनबावडा १ हजार २९७, पन्हाळा ५ हजार ९२४, शाहूवाडी ४ हजार ६७३, गडहिंग्लज ८०७, आजरा ३६१, चंदगड २ हजार ३०९, भुदरगड १ हजार ९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Kolhapur Flood
'या' योजनांसाठी KYC अपडेट करा असा Message येतोय? मग, सावधान! फसव्या लिंकला वयस्कर लोक पडताहेत बळी

पूरनुकसानीचे १२२ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले आहेत. आत्तापर्यंत २५ कोटी रुपये वाटप केले आहे. उर्वरित रक्कमेचे तत्काळ वाटप केले जात आहे.

-संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी

तालुकानिहाय रक्कम अशी

तालुका नुकसानीची रक्कम (रुपयांमध्ये)

  • करवीर २२ कोटी १ लाख

  • कागल ६ कोटी २३ लाख

  • राधानगरी ४ कोटी ११ लाख

  • गगनबावडा ३ कोटी ४८ लाख

  • पन्हाळा १५ कोटी ८७ लाख

  • शाहूवाडी ११ कोटी ६३ लाख

  • हातकणंगले ११ कोटी ७९ लाख

  • इचलकरंजी ११ कोटी ५३ लाख

  • शिरोळ २५ कोटी ६७ लाख

  • गडहिंग्लज १ कोटी ७२ लाख

  • आजरा १ कोटी ३ लाख

  • चंदगड ४ कोटी ४१ लाख

  • भुदरगड २ कोटी ८८ लाख

एकूण १२२ कोटी ४२ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.