Kolhapur : पूरग्रस्तांतून संताप; दोन महिन्यांनंतरही अनुदान नाहीच

याद्या, पंचनामे करण्याची कामे अद्यापही सुरूच
Kolhpur : पूरग्रस्तांतून संताप; दोन महिन्यांनंतरही अनुदान नाहीच
Kolhpur : पूरग्रस्तांतून संताप; दोन महिन्यांनंतरही अनुदान नाहीच
Updated on

इचलकरंजी : पूर ओसरून दोन महिने उलटले तरी पूरग्रस्तांची प्रतीक्षा काही संपता संपेना झाली आहे. याद्या तयार करणे, पंचनामे ही कामे सुरूच आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीची प्रक्रिया अजूनही पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे पूरग्रस्तांच्या संतापाचा सूर वाढत आहे. तर दुसरीकडे अनुदानाची प्रतीक्षा लांबताना दिसत आहे. त्यामुळे महापुराच्या कामातून लवकर बाहेर पडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता प्रशासनाची धडपड वाढली आहे.

आतापर्यंत एकूण ७ हजार ९७३ पूरग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदानाचे वाटप केले आहे. त्यापैकी सुमारे ४९ टक्के कुटुंबांना अद्याप दुसरा हप्ता मिळाला नाही. येथील अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागातील एकूण नऊ गावे येतात. सर्व गावांना पुराचा फटका बसल्याने मदतीचा आकडा मोठा आहे. पंचनामे पूर्ण झाले असले तरी हरकतींचा पाढा अजून सुरूच आहे. काही जणांचा उशिरा यादीत समावेश करून अनुदान जमा केले जात आहे. व्यवसाय, शेतीची नुकसानभरपाई अजूनही लाभार्थ्यांच्या हातात पडली नाही. त्यामुळे पुरग्रस्तांच्या अनुदानाच्या कामाला आता गती देणे आवश्यक आहे.

Kolhpur : पूरग्रस्तांतून संताप; दोन महिन्यांनंतरही अनुदान नाहीच
राज्यात उद्यापासून जोरदार पावसाचा इशारा!

दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा कायम

पूरग्रस्त कुटुंबांना पहिला सानुग्रह अनुदानाचा हप्ता मिळाला. मात्र यातील ३ हजार ९६९ कुटुंबांना अद्याप दुसरा पाच हजार रुपयांचा हप्ता मिळाला नाही. पहिला हप्ता मिळून तीन आठवडे उलटले तरी दुसरा हप्ता रखडला आहे. त्यामुळे या कुटुंबांना दुसऱ्या हप्त्याची आशा कायम आहे.

निर्वाह भत्त्याची यादी तयार

पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी आले नाही पण ज्यांना स्थलांतर करावे लागले. अशा कुटूंबांना शासन निर्वाह भत्ता देणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अप्पर तहसील कार्यालयाने आता निर्वाह भत्ता लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये २ हजार ५६९ कुटुंबांचा समावेश आहे. मात्र याबाबत मदतीचा ठोस निर्णय काहीच नाही. या कुटुंबांना २०१९ प्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार की त्यामध्ये वाढ अथवा कमी होणार हे आता अनुदान आल्यानंतर समजणार आहे.

Kolhpur : पूरग्रस्तांतून संताप; दोन महिन्यांनंतरही अनुदान नाहीच
भारती पवारांचे आरोप बिनबुडाचे! नाशिकमध्ये आरोप-प्रत्यारोप

नुकसानभरपाईच्या अनुदानाला गती

घर पडझड, गोठा पडझड, व्यवसाय, मृत जनावरे, शेती आदींच्या नुकसानीबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर झाली नाही. पूर ओसरून दोन महिने होत आले, तरी पूरग्रस्तांच्या पदरी केवळ निराशा आहे. याबाबत नुकसानभरपाईची कच्ची यादी अप्पर तहसील कार्यालयाने तयार केली आहे. याची पडताळणी करून यादी शासनाकडे पाठवली जाणार आहे. पुरग्रस्तांची विचारणा वाढल्याने सध्या या कामाला गती मिळाली आहे.

४६९ पूरग्रस्त कुटुंबे वाढली

आतापर्यंत ७ हजार ५०४ कुटुंबांना सानुग्रह अनुदानाचे वाटप झाले आहे. यामध्ये आणखी ४६९ पूरग्रस्त कुटुंबांची भर पडली आहे. रांगोळी येथील ७ तर इचलकरंजीतील ४६२ कुटुंबे आहेत. त्यांना अनुदानाचा पहिला पाच हजार रुपयांच्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.