Kolhapur Flood Helpline: पूरपरिस्थितीत कुठं साधणार संपर्क? कोल्हापूर पालिकेने जारी केले हेल्पलाइन क्रमांक

Panchganga River: जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.
Kolhapur Flood Helpline Numbers
Kolhapur Flood Helpline NumbersEsakal
Updated on

कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.

दरम्यान पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी आता 47 फुटांवर पोहचल्याने कोल्हापूर महानगर पालिकेने नागरिकांच्या सुरक्षतेसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

दरम्यान महानगरपालिकेने नागरिकांना कोणती अडणच आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून मतद मागण्याचे आवाहन केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कोल्हापूर महानगरपालिका

संपर्क: 0231-2541188 आणि 8956412103

मुख्य नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल

संपर्क: 0231-2537221 आणि 8956412102

Kolhapur Flood Helpline Numbers
Pune Rain Updates: पुण्यासाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाने काय इशारा दिला?

सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात प्रशासनाने पुरग्रस्त भागात भेटी आणि मदतकार्य सुरू केल्याची माहीती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी काल रात्री पुरग्रस्त भागात भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर मदतकार्याचा आढावा घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले.

Kolhapur Flood Helpline Numbers
Belapur Building Collapsed: सलून चालकाला जाग आली अन् वाचले शेकडो प्राण! बेलापूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली

दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूर शहरातील सुतारवाडा, कुंभारगल्ली, जामदार क्लब येथील पुरबाधित भागातील चित्रदुर्ग मठ निवारागृहाला भेट दिली.

यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पुरस्थितीबाबतची माहिती जाणून घेतली. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.