पन्हाळगडच्या तटबंदीतील 10 ते 12 फूट उंचीची दगडी शिळा कोसळली; नागरिकांत भीतीचं वातावरण, नेमकं काय घडलं?

गेल्या तीन चार वर्षांपासून पन्हाळगडावर भूस्खलनाची मालिका चालू आहे.
Landslide at Panhalgad
Landslide at Panhalgadesakal
Updated on
Summary

आज पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठेच्या बाजूला पन्हाळगडाच्या तटबंदीतील अंदाजे दहा ते बारा फूट उंचीची शिळा कोसळल्याची घटना घडली.

पन्हाळा : पन्हाळगडावरील चार दरवाजापासून सुरु होणाऱ्या पूर्वेकडील व पायथ्याशी असलेल्या मंगळवारपेठ गावठाणातील ग्रुप ग्रामपंचायत बुधवारपेठ कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या तटबंदीतील दगडी शिळाच्या समूहातील एक शिळा रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळली.

गेल्या तीन चार वर्षांपासून पन्हाळगडावर भूस्खलनाची (Landslide at Panhalgad) मालिका चालू आहे. यामुळे दोनवेळा मुख्य रस्ता बंद झाला होता. तीच मालिका आजच्या घटनेने यावर्षीही चालू राहिली असल्याचे बोलले जात आहे. आज पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठेच्या बाजूला पन्हाळगडाच्या तटबंदीतील अंदाजे दहा ते बारा फूट उंचीची शिळा कोसळल्याची घटना घडली.

Landslide at Panhalgad
Kolhapur Flood : महापुराचा विळखा कायम! कोल्हापुरातील तब्बल 5 हजार 845 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

येथील ग्रामपंचायत पिछाडीस रात्री नऊच्या दरम्यान तटबंदीतून मोठा आवाज आला. त्या आवाजाने मंगळवारपेठेतील लोक घराबाहेर आले. पण, त्यावेळी कोसळणाऱ्या पावसामुळे व काळोखामुळे काही दिसत नव्हते. त्यामुळे नेमके काय झाले आहे हे समजत नसल्याने येथे भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी वैभव कोळी, सरपंच पुष्पा कदम, विलास कदम, पोलिस पाटील रघुनाथ बुचडे व पन्हाळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व बॅटरीच्या प्रकाशझोतात तटबंदी पाहिली असता, तटबंदीतून दगडी शिळा कोसळल्याचे दिसले.

पण, मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे भूस्खलनाची तीव्रता समजण्यास कठीण जात होते. मात्र, बॅटरीच्या प्रकाशझोतात एका ठिकाणी असलेल्या दगडी शिळाच्या समूहातील एक शिळा कोसळल्याचे दिसत होते. या भागात गेली चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी चोवीस तासात पन्हाळ्यात 118 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.