Kolhapur Flood : महापुराचा विळखा कायम! कोल्हापुरातील तब्बल 5 हजार 845 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

पंचगंगेची (Panchganga River) पाणीपातळी रात्री बाराला ४६.५ फूट इतकी होती.
Kolhapur Flood
Kolhapur Floodesakal
Updated on
Summary

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील एकूण ८७ राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.

कोल्हापूर : धरण क्षेत्रात काही काळ पावसाचा (Kolhapur Flood) जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) सहा पैकी दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. मात्र, सायंकाळनंतर धरण क्षेत्रात पुन्हा धुवाँधार पाऊस सुरू झाला. पंचगंगेची तासा-तासाला वाढणारी पाणीपातळी अनेक भागांतील लोकांच्या हृदयाचा ठोका वाढवित होती. जिल्हाभर कोसळणाऱ्या पावसाने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.

यामध्ये शहरातील १०५ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, आज पहाटे शिवाजी पूल येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची मच्छिंद्री झाली. पंचगंगेची (Panchganga River) पाणीपातळी रात्री बाराला ४६.५ फूट इतकी होती. धरण क्षेत्रातील पावसाने सकाळी काही काळ विश्रांती दिल्याने राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक एक दुपारी तर क्रमांक तीनचा दरवाजा सायंकाळी बंद झाला. चार दरवाजांमधून ७,२१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढच होत आहे.

दरम्यान, सकाळी तासभर सूर्यदर्शन झाल्याने नागरिक सुखावले होते; पण नंतर थांबून थांबून पावसाची झोड सुरूच होती. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. परिणामी, सुमारे पंधरा हजार हेक्‍टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यापैकी साठ टक्के क्षेत्र उसाखालचे तर उर्वरित क्षेत्र भात व अन्य खरीप पिकांचे आहे. नद्यांचे पाणी सर्वदूर पसरल्याने शिवारे पाण्याखाली गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील एकूण ८७ राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.

Kolhapur Flood
साताऱ्यातील धबधबे, पर्यटनस्थळे पाहण्यासाठी जात असाल, तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय महत्त्वाचा आदेश

तसेच ९१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील दूध व्यवसायावर झाला आहे. गोकुळ आणि वारणा संघांसारख्या संस्थांचा लाखो लिटरचा दुधाचा पुरवठाही ठप्प झाला आहे. दूध संकलनातही घट झाली आहे. पाणीपातळी वाढत असल्याने जिल्ह्यातील एक हजार ३६७ कुटुंबांतील ५ हजार ८४५ नागरिकांचे आणि तीन हजार ४१५ जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. त्याच दरम्यान २४० कच्च्या व पक्क्या घरांची पडझड झाली. २४ गोठ्यांची पडझड होऊन सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले.

सध्या आलमट्टी धरणाचा दोन लाख ७५ हजार क्युसेक विसर्ग आहे. त्याचबरोबर कोयनेतून ३२ हजार १०० क्युसेक, राधानगरी धरणातून सात हजार २१२ क्युसेक, वारणा धरणातून १५ हजार ७८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून रात्री आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापुराचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur Flood
Kolhapur Flood esakal

तालुकावार स्थलांतर

स्थलांतरीत कुटुंबे, नागरिक, जनावरे

तालुका कुटुंबे नागरिक जनावरे

करवीर ११९९ ५०९८ १०७०

पन्हाळा ०८ ४० ०४

हातकणंगले ३५ १८१ २०७९

भुदरगड ३ ९ --

गडहिंग्लज १ ७ ३०

चंदगड २ ७ --

इचलकरंजी (महापालिका) ३४ १४० --

इचलकरंजी (अपर तहसील कार्यालय) ३३ १७० २०२

कोल्हापूर (महापालिका) २४ १०३ --

शाहूवाडी ०७ २१ ०८

कागल २१ ६९ २२

Kolhapur Flood
पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक मंद गतीने; निपाणीतील मांगुर फाट्यावरची काय स्थिती? पोलिस घटनास्थळी दाखल

धरण क्षमता पाणीसाठा टक्केवारी विसर्ग

दुधगंगा २५०३९ २०.७२ ८१.५९ ३५००

तुळशी ३.४७ ३.२० ९२.३१ ८००

कासारी २.७७४ २.२४ ८०.८५ १४७०

कडवी २.५१६ २.५२ १०० २०००

कुंभी २.७१५ २.१५ ७९.२९ ३००

पाटगाव ३.७१६ ३.५४ ९५.१९ २००

चिकोत्रा १.५२२ १.१२ ७३.३३ --

चित्री १.८८६ १.८९ १०० १८२५

जंगमहट्टी १.२२३ १.२२ १०० ९८६

घटप्रभा १.५६० १.५६ १०० ७५३५

जांबरे ०.८२० ०.८२ १०० १२५६

आंबेओहोळ १.२४० १.२४ १०० ३०४

सर्फनाला ०.६७० ०.४८ ७१.०६ १४६२

धरण क्षमता पाणीसाठा टक्केवारी विसर्ग (क्यूसेक)

राधानगरी ८.३६ ८.३६ १०० ७२१२

वारणा ३४.३९ ३०.५२ ८८.७३ १५७८५

आलमट्टी १२३.८ ८३.४८३ ६७.६३ २.७५०००

कोयना १०५.३ ८१.१९ ७७.१४ ३२१००

Kolhapur Flood
Koyna Dam : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; कृष्णा-कोयना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा

महापुरातून....

शहरातील १०५ नागरिकांचे स्थलांतर

साडेतीन हजार जनावरांचे स्थलांतर

घरांची पडझड होऊन जिल्ह्यात सुमारे ८० लाखांचे नुकसान

शहरातील शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, पंचगंगा तालीम, रमनमळा, उलपे मळा येथे पाणी

बापट कॅम्प परिसरात गणेशमूर्ती सुरक्षितस्थळी हलविल्या

आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांकडून खुपिरेतील रुग्णांचे स्थलांतर

पणुत्रे येथे घर कोसळून नुकसान

जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले

सरुड-सागाव रस्ता वाहतुकीसाठी बंद

मरळी पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद

कांचनवाडी-चाफोडी पुलावर पाणी

रुई-इंगळी मार्गावर पाणी

वारणा नदीतील बेपत्ता तरुणाचा शोध सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.