Kolhapur Flood : पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या खाली; 'राधानगरी'चे चार स्वयंचलित दरवाजे खुले, तीन बंद

आलमट्टी व कोयना धरणांतून विसर्ग वाढविला आहे. पावसाने मंगळवारी (ता. ३०) दिवसभरात उघडीप दिल्याने पूर ओसरायला सुरुवात झाली.
Kolhapur Flood
Kolhapur Floodesakal
Updated on
Summary

राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत काही इंचांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या आलमट्टी व कोयना धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला.

कोल्हापूर : दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला होता; परंतु आज पहाटे धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. दिवसभरात येथे पाऊस कमी झाल्याने सायंकाळपर्यंत यातील तीन दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद झाले. आता चार दरवाजांमधून ७२१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी काही इंचांनी वाढण्याची शक्यता आहे.

सद्य:स्थितीत पंचगंगा धोक्याच्या (Panchganga River) खाली ४२ फूट ९ इंचांवर वाहत आहे. आलमट्टी व कोयना धरणांतून विसर्ग वाढविला आहे. पावसाने मंगळवारी (ता. ३०) दिवसभरात उघडीप दिल्याने पूर ओसरायला सुरुवात झाली; पण काल पहाटे धरण क्षेत्रात झालेल्या धुवांधार पावसाने राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला. दिवसभरात पाऊस कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने तीन दरवाजे बंद झाले.

Kolhapur Flood
Flood News : कर्नाटक- महाराष्ट्रातील महापूर कसा टळला? मंत्र्यांनी सांगितलं कारण

असे असले तरी राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत काही इंचांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या आलमट्टी व कोयना धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला. आलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेक तर कोयना धरणातून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून १०,५८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण ९३ मार्ग आणि ७७ बंधारे पाण्याखाली आहेत.

पावसामुळे जिल्ह्यात घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड होऊन ६६ लाख ६२ हजारांचे नुकसान झाले, तर सात शेळ्या व एक बैल मृत होऊन सुमारे एक लाख २० हजारांचे नुकसान झाले. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल यंत्रणेकडून आजही सुरू राहिले. दरम्यान, शहरात पाणी ओसरलेल्या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तसेच या ठिकाणी स्वच्छता व औषध फवारणीचे काम महापालिकेकडून सुरू होते.

धरणसाठा (टीएमसीमध्ये, ता. ३१ जुलै)

धरण क्षमता पाणीसाठा टक्केवारी विसर्ग (क्युसेकमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ८.२८ ९९ ८६४०

  • वारणा ३४.३९ २९.६० ८६.०५ ८०९२

  • आलमट्टी १२३.८ ६७.६५ ५४.९७ ३५००००

  • कोयना १०५.३ ८५.५९ ८१.३२ ४२०००

  • दूधगंगा २५.३९३ २२.१८ ८७.३६ ९१००

  • तुळशी ३.४७ ३.२९ ९४.९२ २०००

  • कासारी २.७७४ २.२८ ८२.१० २७०

  • कडवी २.५१६ २.५२ १०० ७२०

  • कुंभी २.७१५ २.३७ ८६.१२ ३००

  • पाटगाव ३.७१६ ३.७२ १०० ११००

  • चिकोत्रा १.५२२ १.४२ ९३.५८ ५००

  • चित्री १.८८६ १.८९ १०० ८२५

  • जंगमहट्टी १.२२३ १.२२ १०० ३३५

  • घटप्रभा १.५६० १.५६ १०० ३९९३

  • जांबरे ०.८२० ०.८२ १०० १०३०

  • आंबेओहोळ १.२४० १.२४ १०० ११०

  • सर्फनाला ०.६७० ०.६७ १०० ६६९

Kolhapur Flood
Almatti Dam : 3 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग 'आलमट्टी'तून कायम ठेवू; धरणाच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही

धरणाचे दरवाजे उघडल्याने शहरात धास्ती

शहरातील पूरस्थिती पूर्ण कमी झालेली नाही. त्यातच राधानगरी धरणाचे सात दरवाजे आज उघडल्याने पूरक्षेत्रातील नागरिकांची धास्ती वाढली. पुराचे पाणी वाढणार, अशी चर्चा असल्याने चिंता लागली होती. सुतारवाडा, बापट कॅम्प परिसरातील पाणी आज कमी झाले असले तरी धरणातून सुटलेल्या पाण्याने तिथे पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता होती. तसेच धोका पातळीजवळ रात्री पाणी असल्याने या परिसरातील ४८ कुटुंबांतील २०४ नागरिक अजूनही पाच निवारा केंद्रांत आहेत. त्यातील सर्वाधिक सुतारवाडा परिसरातील नागरिक आहेत. उद्यापर्यंत पाण्याचा अंदाज घेऊन हे नागरिक घरी परततील, अशी शक्यता आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अद्याप बंदच

पन्हाळा रोडवरील जगबुडी पुलावर अद्याप पाणी असल्याने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी बंदच ठेवला आहे. शिवाजी पूल येथे हा मार्ग बंद केला असला तरी, या मार्गावरील पाणी ओसरलेल्या गावांतील नागरिकांची दुचाकीची वाहतूक सुरू आहे.

दृष्टिक्षेपात जिल्हा...

  • पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ शक्य

  • पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे सुरूच

  • जिल्ह्यात ४३.८ मि.मी. पावसाची नोंद

  • शहरात पूर ओसलेल्या भागात स्वच्छता व औषध फवारणी

  • वारणा धरणातील विसर्ग घटविला

  • ९३ मार्ग बंद; ७७ बंधारे पाण्याखाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.