Rautwadi Waterfall : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! राऊतवाडी धबधब्याबाबत प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

राऊतवाडी धबधबा गेल्या काही वर्षात पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा सहलींसाठी येथे येतात.
Kolhapur Rain Update Rautwadi Waterfall
Kolhapur Rain Update Rautwadi Waterfallesakal
Updated on
Summary

सध्या पावसाचा जोर वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला.

राशिवडे बुद्रुक : पावसाचा वाढलेला जोर आणि धबधब्याने धारण केलेले उग्ररूप यामुळे राऊतवाडी धबधबा (Rautwadi Waterfall) पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्याचे लक्षात घेऊन अनुचित प्रकार घडू नये, म्हणून येथील प्रशासनाने आजपासून पावसाचा जोर कमी होईपर्यंत पर्यटकांना इथे बंदी केली आहे.

राऊतवाडी धबधबा गेल्या काही वर्षात पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा सहलींसाठी येथे येतात. सध्या पावसाचा जोर वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला. गेल्या चार दिवसांत राधानगरी तालुक्यात पावसाने जोर धरल्याने राऊतवाडी धबधब्याला मोठा व प्रचंड वेगाने पाण्याचा स्त्रोत सुरू झाला आहे.

Kolhapur Rain Update Rautwadi Waterfall
Kolhapur Flood : कोल्हापूरला महापुराचा विळखा! पंचगंगा धोका पातळीवर; 81 बंधारे पाण्याखाली, कोणते मार्ग बंद?

यातून मोठमोठे दगड - धोंडे वाहून येतात. पाण्याला वेग इतका आहे की, पाण्यात उतरणेही धोक्याचे ठरत आहे. यामुळे तहसील व पोलिस प्रशासनाने पर्यटकांना हा धबधबा बंद केला आहे. ‘आजपासून पावसाची तीव्रता कमी होऊन धबधब्याचा प्रवाह आटोक्यात येईपर्यंत ही बंदी असेल,’ अशी माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.