Kolhapur Flood : कोल्हापुरातील 'इतक्या' मार्गांवरील S.T वाहतूक पूर्णपणे बंद; 'या' पर्यायी मार्गाने वळवली वाहतूक

कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्तेही बंद झाले आहे.
Kolhapur Flood ST Traffic
Kolhapur Flood ST Trafficesakal
Updated on
Summary

पावसामुळे जिल्ह्यातील वीस मार्गांवरील एस. टी. (S.T) वाहतूक पूर्ण बंद केली. पाच मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

कोल्हापूर : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर धुवाँधार पाऊस (Kolhapur Monsoon Rain) पडल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढून ७.३६ टीएमसी झाला होता. पंचगंगेची पातळी रात्री एक वाजता ४१.९ फूट इतकी होती. दरम्यान, बावडा-शिये मार्ग रात्री उशिरा बंद करण्यात आला.

कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्तेही बंद झाले असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे. तसेच पावसामुळे जिल्ह्यातील वीस मार्गांवरील एस. टी. (S.T) वाहतूक पूर्ण बंद केली. पाच मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

पूर्ण बंद असलेले मार्ग (कंसात पाणी आलेले ठिकाण) : कोल्हापूर ते गगनबावडा (मांडुकली), रंकाळा ते आरळे (कोगे, महे पूल), रंकाळा ते बाजार भोगाव (पोहाळे नदी रस्ता), रंकाळा ते चौके (गोटे पूल), रंकाळा ते तिरपण (पुशेरे पूल), रंकाळा ते गगनबावडा (खोकुर्ली, शेणवडे, पडवळवाडी रस्ता), हुपरी ते कागल (इचलकरंजी पूल), कुरुंदवाड ते नृसिंहवाडी (इचलकरंजी पूल), इचलकरंजी ते कर्नाटक (इचलकरंजी पूल), इचलकरंजी ते खिद्रापूर (इचलकरंजी पूल).

Kolhapur Flood ST Traffic
Mahabaleshwar Project : तब्बल 235 गावांचा समावेश असलेल्या 'नवीन महाबळेश्वर'ला वाढता विरोध; काय आहे कारण?

तसेच चंदगड ते इब्राहिमपूर (इब्राहिम पूल), चंदगड ते बुजवडे (बुजवडे पूल), चंदगड ते भोगोली (भोगोली पूल), चंदगड ते पिळणी (पिळणी पूल), चंदगड ते नांदवडे (चंदगड पूल), चंदगड ते पारगड (चंदगड पूल), चंदगड ते कोदाळे (चंदगड पूल), चंदगड ते नागवे (चंदगड पूल), गगनबावडा ते कोल्हापूर (लोंघे, किरवे, खोकुर्ली व गोटे पूल), आजरा ते चंदगड (गवसे बंधारा).

पर्यायी मार्गाने वाहतूक

(कंसात पाणी आलेले ठिकाण) : इचलकरंजी ते कुरुंदवाड (शिरढोण पूल), गडहिंग्लज ते कोवाड (ऐनापूर, निलजीच्या बंधाऱ्यावर पाणी), चंदगड ते माणगाव (माणगाव पूल), कुरुंदवाड ते इचलकरंजी (शिरढोण पूल, जयसिंगपूरमार्गे पर्यायी वाहतूक), आजरा ते साळगाव (साळगाव पूल, बाचीमार्गे पर्यायी वाहतूक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.