Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली, मांडुकली येथे १८ प्रवासी अडकले

Kolhapur Flood Update: पावसाचा जोर सुरूच; जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड
Flood Kolhapur
Flood KolhapurSakal
Updated on

Kolhapur Flood Update: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले असून, वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

इचलकरंजीत स्मशाभूमीत पाणी

येथील पंचगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर पडले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी वरदविनायक मंदिरात शिरले आहे. त्यामुळे दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. स्मशाभूमीत पुराचे पाणी आले आहे; पण स्मशानशेड उंचावर असल्याने अद्याप दहन विधी सुरू आहेत.

पाण्याच्या पातळीत आणखी काही इंच वाढ झाल्यास दहनविधी बंद करावा लागणार आहे. दरम्यान, आज रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे पूर पाहण्यासाठी नवीन पुलावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

पंचगंगा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत संथगतीने वाढ होत आहे. सायंकाळी ६२ फुटांच्या पुढे पाणी पातळी सरकत होती. इशारा पातळी ६८ फूट आहे. त्यामुळे इशारा पातळीच्या दिशेने पुराची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना यापूर्वी महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Flood Kolhapur
Kolhapur Flood Update : नृसिंहवाडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा, ‘दिगंबरा...दिगंबरा...’चा जयघोष करीत स्नान पर्वणीचा लाभ

पुराचे पाणी पात्राबाहेर पसरत चालले आहे. पुढील एक-दोन दिवसांत अतिवृष्टी झाल्यास नागरी वस्तीत पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे; मात्र पातळीत संथगतीने वाढ होत असल्याने प्रशासन सध्या तरी केवळ लक्ष ठेवून आहे.

महापालिकेचे सहायक आयुक्त केतन गुजर यांनी आज पंचगंगा नदी काठावरील पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Flood Kolhapur
Kolhapur Rain Update: मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही वाहतूक झाली सुरळीत, वाहनचालकांनी केले राधानगरी पोलीसांचे कौतुक

गगनबावडा- कळे मार्ग बंद

गगनबावडा : तालुक्यातील कोदे प्रकल्पावर उच्चांकी २७६ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. कुंभी नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे आल्याने गगनबावडा ते कळे हा मार्ग आज बंद राहिला. तालुक्यातील तीन घरांची अंशतः पडझड होऊन १५ हजारांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील बहुतांश गावांचे दोन्ही वेळचे दूध संकलन झाले नाही. टेकवाडीला पुराचा वेढा पडला आहे. गगनबावडा तालुक्यातील कुंभी, सरस्वती, धामणी व रुपणी या नद्यांना पूर आला आहे. शनिवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे मांडुकली येथील रस्त्यावरील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली.

सकाळी मांडुकली येथील रस्त्यावरील पाण्याची पातळी तीन फूट तर दुपारी पाच फुटांच्या आसपास गेली. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर खोकुर्ले, किरवे या ठिकाणीदेखील पुराचे पाणी आले. मार्गावर ठिकठिकाणी पाणी असल्यामुळे रविवारी दिवसभरातले दूध संकलन झाले नाही.

कुंभी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने ४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रामध्ये सुरू केला आहे. परिणामी कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा कळे पाटबंधारे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी दिला आहे.

Flood Kolhapur
Kolhapur Rain : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर! 75 बंधारे पाण्याखाली; जाणून घ्या कोणते मार्ग सुरु, कोणते बंद

मांडुकली येथे १८ प्रवासी अडकले

शनिवारी रात्री मांडुकली येथे दोन ठिकाणी पाणी आले. या दरम्यान आलेल्या वाहनातील १८ प्रवासी मांडुकली येथे अडकले. प्रशासनाने त्यांची येथील केंद्रशाळा मांडुकली शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे.

मुदाळतिट्टा - मुरगूड मार्गावरील वाहतूक बंद

संततधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने निपाणी - देवगड राज्यमार्गावरील मुरगूड-निढोरी दरम्यानच्या स्मशानभूमीजवळ पुराचे पाणी आले आहे. परिणामी मुदाळतिट्टा - मुरगूड या मार्गावरुन होणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. आज सकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढली. एवढ्या पाण्यातून वाहतूक करणे सहज शक्य होते.पण या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे.रस्ता काँक्रिटीकरणासाठी एका बाजूला खोदकाम केलेले आहे.

ओढ्याच्या पुलास संरक्षण कठडे नाहीत. ऐन पावसाळ्यातच रस्ता खोदल्यामुळे हा रस्ता लगेच बंद करावा लागला. मुरगूडच्या दत्त मंदिर परिसरातदेखील पाणी आल्याने वाघापूर- मुरगूड वाहतूक बंद झाली आहे, तर निढोरी व मुरगूड येथे पोलिसांनी आठ ठिकाणी बॅरिकेड्‌स उभा करुन पुरासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

शिवाय मुरगूड - निढोरी येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पुरामूळे आदमापूर, निढोरी गावांचे पाणीपुरवठ्याचे जॅकवेलही पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास शिंदेवाडी येथेदेखील रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.

कोलोली येथे नागरिकांना स्थलांतराची नोटीस

कोतोलीः कोलोली (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे ४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, यासाठीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. २०२१ साली कासारी नदीला आलेल्या महापुरामुळे कोलोली गावातील अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या वर्षीही पावसाचे प्रमाण वाढत असून, अतिवृष्टी व संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, याबाबत नोटीस देण्यात आल्याची माहिती उपसरपंच पी. आर. पाटील यांनी दिली.

Flood Kolhapur
Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

कडवी धरण ७९ टक्के भरले

आंबाः पावसाच्या संततधारेमुळे शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील कडवी धरण ७९ टक्के भरले आहे. रविवारी दिवसभरात पावसाने थोडीफार उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. कडवी नदीला पूर आल्याने भोसलेवाडी,

कोपार्डे, शिरगाव, सवते - सावर्डे व सरूड - पाटणे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मानोली येथील लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरला आहे. तलावाच्या बॅकवॉटरमुळे तयार झालेला धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.