Kolhapur Flood Update : धरणे भरली नाहीत, मग पूर का आला ?

विज्ञान प्रबोधनीचा सवाल; अभ्यासकांनी मांडलेल्या उपायांकडे दुर्लक्ष
kolhapur
kolhapuresakal
Updated on

कोल्हापूर : पंचगंगा, कृष्णा नदीवरील धरणे अद्याप भरलेली नाहीत. आलमट्टी धरणात पाणीसाठा ६२ टीएमसी असून एक लाख १४ हजार ४४५ क्युसेक इतके पाणी आवक आहे. धरण भरायला आणि बॅक वॉटरचा परिणाम होण्यासाठी अद्याप पुरेसा अवधी आहे. असे असूनही पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

अभ्यासकांनी मांडलेली निरीक्षणे, सूचवलेल्या उपाययोजना याकडे दुर्लक्ष केल्यानेच पूरजन्य स्थिती उद्‌भवली आहे, असे अभ्यासपूर्ण मत विज्ञान प्रबोधनीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी मांडले आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, अनिल चौगुले यांनी हे पत्र प्रसिद्ध केले आहे.

पत्रकातील म्हटले आहे, पंचगंगेच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिमी. पाऊस झाला. आलमट्टी धरण भरायला आणि बॅक वॉटरचा परिणाम होण्यासाठी अद्याप अवधी आहे. त्यांनी सध्या विसर्ग करण्याची गरज नाही. कोयना धरणात सध्या ५१.७८ टीएमसी इतका साठा असून विसर्ग सुरू नाही.

kolhapur
Kolhapur Flood Update : पूरग्रस्त ३७ हजार कुटुंबांना मिळणार नोटिसा; जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

त्याचबरोबर अन्य धरणांमधून विसर्ग सुरू नाही. तरीदेखील आज पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली. राधानगरी ८८ टक्के, कुंभी ८० टक्के, कासारी ७९ टक्के, तुळशी ४६ टक्के इतकेच भरले आहे. ही धरणे अद्याप भरली नसली तरी निश्चित केलेल्या निकषनुसार जास्तीचे पाणी साठवायचे नाही म्हणून कुंभीतून ४००, कासारीतून १००० क्यूसेक विसर्ग सुरू केला आहे. राधानगरीमध्ये वीजघरासाठीच विसर्ग करण्याची सोय असल्याने त्यामागे १४०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तरीदेखील नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

दिवाण, केंगार यांचा दावा फोल

धरणे रिकामी ठेवा, आलमट्टी मुळेच पूर येतो, आधिकारी अभियंते ऐकत नाहीत, असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही, असे ठामपणे मांडणारे जल संपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण व प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

kolhapur
Kolhapur Dams: कोल्हापुरातील धरणांची स्थिती काय? जाणून घ्या पाणी पातळी किती?

सद्याच्या पुराची कारणे...

नद्याची नैसर्गिक वळणे

नद्यांच्या पात्रात वाढलेले गाळाचे प्रमाण

धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण

नद्यांच्या पात्रामधील अतिक्रमणे

नदी पात्रात असलेले बंधारे

बेकायदा पुल आणि त्याचे भराव यामुळे तयार झालेली धरण सदृश्य परिस्थिती

पूर बाधित क्षेत्रात झालेली बांधकामे

रस्त्यांचे भराव, खरमाती व कचऱ्याचे ढीग

पूर बाधित क्षेत्रात उसाचे पीक

‘राधानगरी’तून वीज घराखेरीज पाण्याचा विसर्ग दरवाजा नादुरुस्त असल्याने न करता येणे

खुल्या क्षेत्रात होणारा पाऊस मोजता न येणे आणि त्यावर नियंत्रण नसणे

पुलाच्या मोऱ्यांतून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब

kolhapur
Kolhapur Rain Flood Update : आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘केडीएमजी’ सज्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.