कोल्हापूर : पंचगंगा नदी (panchaganga river) धोक्याची पातळी ओलांडली असून आंबा घाटात दरड कोसळली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज सकाळी 11 वाजता एकूण 49 फूट 11 इंच इतकी राहिल्यामुळे जिल्ह्यात महापूर (kolhpur flood live) आल्याचे स्पष्ट झाले आहे. (kolhapur rain update) पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट असतानाही पन्नास फुटापर्यंत पाणी पोचले आहे. बेळगाव मार्ग बंद झाला असून सेवा रस्त्यावर पाणी आले आहे. किनी टोल नाक्यावर कोठेही पाणी नाही. कोल्हापूर- सांगली फाट्यावरील सेवा रस्त्यावर पाणी आले आहे. कोल्हापूर इचलकरंजीमध्ये येणारी हलकी वाहने कोल्हापूरकडे सोडणे सुरु आहे, परंतु जड वाहनांना प्रवेश बंद आहे, असे वडगांव पोलिसांनी कळवले आहे. जिल्ह्यातील (kolhapur district) एकूण 116 बंधारे पाण्याखाली असून शहरातही पाणी घुसले आहे. सध्या कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याचा विसर्ग हा 68 हजार 334 क्युसेक आहे.
जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलमट्टीचा (almatti dam) विसर्ग होणे आवश्यक होते. जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या संपर्कानंतर 23 जुलैला सकाळी दहा वाजता अलमट्टी धरणातून सुमारे दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तरीही पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर 49 फुटावून अधिक आहे. 2019 मध्ये ही पातळी सर्वाधिक म्हणजे 54 फुटापर्यंत पोचली होती.
करवीर तालुक्यातील परिते रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. जिल्ह्यात हाहाकार उडाल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही जनावरे आणि व्यक्तींना स्थलांतरित केले जात आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट असल्याने साधारण 48 ते 72 तास कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस कायम राहणार असून अनेक कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यास एनडीआरएफच्या टीमसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन काम करीत आहे. दरम्यान चिखली आंबेवाडी येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बोटीचे सहय्याने पंचगंगा नदीवर आणण्यात आले. एनडीआरएफ जवानांनी नागरिकांची सुटका केली आहे.
जिल्ह्यातील या रस्त्यांवरील वाहतूक बंद
पुणे- बेंगलोर NH-4 हायवलगत असणारे सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा सर्विस रोड व बेंगलोर पुणेकडून शिरोलीकडे जाणारा सर्विस रोड 3-4 फूट रोडवर पाणी असलेने बंद करण्यात आलेले आहेत.
सांगली फाटा ते सांगलीकडे जाणारे शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बललाईन येथे रोडवर पाणी साचल्याने हा रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे.
हनुमान नगर शिये -कसबा बावड्याकडे जाणारा रस्ता शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीतील शिये नाका येथे बंद असून हनुमान नगर येथे बेरीकटिंग करून बावड्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
शिये-भुये, निगवेकडे जाणारा मेन रोड आडवा ओढा येथे रोडवर तीन ते चार फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. पर्यायी मार्ग आहेत. कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.