पुन्हा एकदा मैदानात फुटबॉलचा थरार रंगला आणि फुटबॉलप्रेमींनी याचा आस्वाद घेतला.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या जगण्याचा अविभाज्य भाग म्हणजे फुटबॉल. फुटबॉल आणि कोल्हापूरकर हे एक आगळ वेगळ घट्ट नातं आहे. कोल्हापूरकर ते मनापासून जपतात आणि जगतातही. कोल्हापूर नगरीत फुटबॉलप्रेमींची कमी नाही. अगदी लहानतला लहान ते मोठ्यातला मोठा व्यक्ती या फुटबॉलसाठी वेडा आहे. पण गेली दोन वर्ष कोरोनामुळे फुटबॉलचा श्वास गुदमरला होता. मात्र पुन्हा एकदा मैदानात फुटबॉलचा थरार रंगला आणि फुटबॉलप्रेमींनी ऑनलाईन या स्पर्धांचा आस्वाद घेतला. (Kolhapur Football)
तब्बल दोन वर्षानंतर स्थानिक फुटबॉल हंगामाचा महापौर चषकाने श्रीगणेशा झाला. यावेळी अनेकांनी याचा ऑनलाईन आनंद घेतला. मात्र कोरोनामुळे सराव आणि स्पर्धापासून खेळाडू आणि संघ दुरावल्याने खेळाची गणित बिघडल्याचे अनेकांनी सांगितले. या फुटबॉल स्पर्धांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. आणि यातील एक झक्कास फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे कोल्हापुरातील (Kolhapur) काही चिमुकल्यांचा. जे लाईव्ह मॅच पाहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फुटबॉल सामना प्रत्यक्ष पाहण्याची मजा या चिमुकल्यांनाही माहिती आहे. शाळेचा अभ्यास एकवेळ ऑनलाईन ठिक आहे, मात्र तालमीचा फुटबॉल सामना ऑनलाईन बघायला होतच नाही. तो शाहू स्टेडियमच्या गॅलरीतूनच पाहण्यात मजा असते. हेच हा फोटो सांगतोय.
कोल्हापूर स्पोटस् असोसिएशनने (KSA) प्रक्षेकांची ऑनलाईन सामना पाहण्याची सोय केली. तरीही लहान मुलांनी प्रत्यक्ष शाहू स्टेडीयमवरच (Shahu Stedium) जाऊनच ठिकाण दिसेल तिथे झोपुन, सामना पाहिला आहे. अशा भन्नाट फुटबॉलप्रेमापासुन या मुलांना कोणीही रोखू शकलेलं नाही. हेच वैशिष्ट्य आहे, की क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे कोल्हापूरकर खूप आहेत. कोल्हापुरातील फुटबॉल वेड्या चिमुकल्यांचा हा फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तुम लाख छुपाओ छुप ना सकेगा, असा आहे कोल्हापूरचा फुटबॉल असा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.