कोल्हापूर : परदेशी पर्यटनाला लागला ब्रेक

नव्या ओमिक्रॉन विषाणूची धास्ती; कोरोना निर्बंध, चाचणीची सक्ती
परदेशी पर्यटन
परदेशी पर्यटनSakal
Updated on

कोल्हापूर : नव्या ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आणि तीन महिन्यांत सुरू झालेल्या परदेशी पर्यटनाला पुन्हा खो बसला आहे. दोन वर्षे घरी बसून कंटाळलेल्या पर्यटकांनी देशी पर्यटनाचा पर्याय स्वीकारला आहे. जिल्ह्यातून १० हजारांवर पर्यटक देशी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. कोरोना प्रतिबंधक दोन डोस घेतलेल्या व्यक्ती सहलीवर जाण्यास प्राधान्य देत आहेत.

दोन वर्षांपूर्वी कोरोना आला. परदेशी विमान सेवा बंद झाली. परदेशी पर्यटनही थांबले. याचवेळी कोल्हापुरातील जवळपास दीड हजारावर पर्यटकांनी परदेशी सहलीसाठी पैसे भरले होते. हे पैसेही टुर्स कंपन्यांनी परदेशात हॉटेल, वाहनांच्या बुकिंगसाठी गुंतवले होते. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर काहींनी पैसे परतही घेतले. तीन महिन्यांपूर्वी अनेक देशांतील कोरोनाची तीव्रता कमी झाली. परदेशी विमान सेवा सुरू झाली. अनेकजण परदेश पर्यटनालाही गेले. त्यांची संख्या जवळपास अडीच हजारांच्या घरात आहे. काहीजण नव्या वर्षात परदेशी पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. काही देशात ओमिक्रॉनमुळे चिंता व्यक्त होऊ लागली.

परदेशी पर्यटन
बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार | Bipin Rawat Funeral

त्यानंतर १५ दिवसांपासून परदेशी पर्यटनाचा अनेकांनी बेत रद्द केला. यावर पर्याय म्हणून अनेकांनी देशांतर्गत हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरातमधील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या सात ते दहा दिवसांच्या सहलीचा आनंद घेत आहेत. अशा जवळपास ५० गट सहली देशभरात पर्यटनाला गेल्या आहेत. सिंगापूर, मलेशिया, थायलंड, स्विझर्लंड या देशात निर्बंध कायम आहेत. दुबई, मालदिव येथे सध्या पर्यटन सुरू आहे. जर्मनी, युरोपमधील पर्यटन सुरू असले, तरी निर्बंधांमुळे एकच देश पाहून परत यावे लागते. दुसऱ्या देशात जाताना आरटीपीसीआरची चाचणी करावी लागते. बाधित आढळल्यास क्वारंटाइन व्हावे लागते.

परदेशी सहलीमध्ये फक्त दुबई व मालदिवला पर्यटक जात आहेत. अन्य ठिकाणी गेल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी करावी लागते. तीन ते सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागते, तर काही देशात प्रेक्षणीयस्थळे खुली झालेली नाहीत. त्यामुळे परदेशी सहलीला जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, देशांतर्गत भागात समुद्र किनारपट्टी, पर्वतीय किंवा पूर्वांचल राज्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढती आहे.

- रवींद्र पोतदार, व्यवस्थापक, गिरीकंद टुर्स टॅव्हल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()