कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील 'हा' पूल वाहतुकीस होणार बंद? राष्ट्रीय महामार्ग खात्याचे आश्वासन हवेतच!

गेल्या वर्षी पावसाळ्यात मच्छिंद्रीला पुराचे पाणी लागल्यामुळे पूल वाहून जाईल, या भीतीने वाहतूक बंद केली होती.
Donawade-Balinga Bridge
Donawade-Balinga Bridgeesakal
Updated on
Summary

राज्य महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल बांधून पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते.

कुडित्रे : कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर (Kolhapur-Gaganbawda Route) दोनवडे-बालिंगादरम्यान भोगावती नदीवरील (Bhogavati River) रिव्हज पुलाची १०० वर्षांची आयुमर्यादा संपली आहे. शाहूकालीन या पुलाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात मच्छिंद्रीला पुराचे पाणी लागल्यामुळे पूल वाहून जाईल, या भीतीने वाहतूक बंद केली होती.

यंदाच्या पावसाळ्याच्या आत पूल (Balinga Bridge) बांधून पूर्ण करू, असे आश्वासन राज्य महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, संथगतीने काम सुरू असून एक पायल फक्त पूर्ण झाला आहे. यामुळे पूल बांधून या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत नाही. परिणामी पावसाळ्यात पुराचे पाणी वाढल्यानंतर पुन्हा या पुलावरून वाहतूक बंद करावी लागणार असून राष्ट्रीय महामार्ग (National Highway) खात्याचे आश्वासन पुलाखालून वाहून गेले आहे.

Donawade-Balinga Bridge
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

२००४-०५ मध्ये पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलावरून कुंभी, राजाराम, भोगावती, शाहू, डी. वाय., दालमिया साखर कारखान्यांसाठी उसाची वाहतूक होते. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, कोकण व गोवा पर्यटकांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या दररोज ३२ हजार टन वाहतुकीचा भार हा पूल सोसतो आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून दिवसभरात लाखो प्रवासी या पुलावरून प्रवास करतात.

Donawade-Balinga Bridge
Gokul Dudh Sangh : 'गोकुळच्या प्रगतीला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नका'; असं का म्हणाले अजितदादा?

गेल्या पावसाळ्यात भोगावती नदीवर पुराची स्थिती निर्माण झाली. तसेच मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांनी कमानीला पाणी लागल्यानंतर वाहतूक बंद करावी, असे आदेश दिले होते. यामुळे जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहतूक बंद केली होती. यामुळे नागरिकांचे हाल झाले. यावेळी नागरिकांनी रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी केली. मात्र, जिल्हाधिकारी व पोलिस खात्याने दुचाकी पादचाऱ्यांना सुद्धा वाहतुकीस मनाई केली होती. अखेर नागरिकांनी आंदोलन छेडले, त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली होती.

यावेळी राज्य महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल बांधून पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. पूल बांधणीसाठी कोणतेही यांत्रिकीकरण नाही, तसेच काही मजुरांकडून फक्त पुलाचा एक पायल टाकून पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता चार महिन्यात पूल बांधून पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जून -जुलैमध्ये पुराच्या पाण्याची पातळी वाढून पुन्हा वाहतूक पंधरा दिवस ते एक महिना बंद करावी लागणार आहे. यामुळे नागरिकांतून आतापासूनच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Donawade-Balinga Bridge
ऐतिहासिक वारसा लाभलेलं 'धर्मगिरी तीर्थक्षेत्र'; जैन धर्मियांची आहे पावन भूमी, या ठिकाणी कसे पोहोचाल?

कंत्राटदाराकडून पूल बांधण्याचे काम संथगतीने सुरू आहे. यंत्रणा कमी पडत आहे. यामुळे त्यांना सहावेळा नोटीस बजावली असून दंड केला जाणार आहे. काम लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

-के. डी. मुधाळे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()