Kolhapur Ganeshotsav : गणपती आगमनासाठी वाहतूक मार्गात मोठा बदल; 'या' मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी, मुख्य रस्त्यावर काय स्थिती?

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत.
Kolhapur Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsavesakal
Updated on
Summary

शाहूपुरी, पापाची तिकटी आणि बापट कॅम्प येथे मंगळवारी (ता. १९) सकाळपासून वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.

कोल्हापूर : गणेश उत्सवाला (Kolhapur Ganeshotsav) मंगळवारपासून (ता. १९) प्रारंभ होत आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती घरोघरी आणल्या जातात. मंडळांच्या मूर्ती देखील मिरवणुकीने आणतात. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत.

Kolhapur Ganeshotsav
Shambhuraj Desai : गणेशोत्सवाबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश; देसाई म्हणाले, गालबोट लागेल असं..

शाहूपुरी, पापाची तिकटी आणि बापट कॅम्प येथे मंगळवारी (ता. १९) सकाळपासून वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. बापट कॅम्प येथे जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. शहरातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या शाहूपुरीतील कुंभार गल्लीत जाणारे सर्व मार्ग मंगळवारी सकाळपासून वाहनांसाठी बंद असतील.

Kolhapur Ganeshotsav
Ganesh Chaturthi : दोन शतकांची परंपरा लाभलेल्या सांगली संस्थानच्या 'चोर गणपती'चं आगमन; काय आहे खासियत?

पापाची तिकटी परिसरातही खासगी वाहनांना प्रवेश बंदी आहे. गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. बहुतांश लोक स्वत:ची वाहने घेऊन येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वांचीच गैरसोय होते. असे प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी कुंभार गल्ल्यांमध्ये वाहन घेऊन जाणे टाळावे, असे आवाहन वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

Kolhapur Ganeshotsav
Ganeshotsav 2023 : चाकरमान्यांनी धरली कोकणाची वाट; गणेश भक्तांनी रेल्वेस्टेशन हाउसफुल्ल, एसटी-खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी

राजारामपुरीत वाहतूक बंद

राजारामपुरी परिसरातील गणेश मंडळांची आगमन मिरवणूक मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे राजारामपुरीतील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मिरवणूक संपेपर्यंत हा मार्ग बंद राहील.

Kolhapur Ganeshotsav
चतुर्थीच्या तोंडावर परब कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर; गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

सहा ठिकाणी पार्किंगची सोय

शाहूपुरीत आयर्विन हायस्कूल पटांगण, शाहूपुरीतील चौथ्या आणि पाचव्या गल्लीत रस्त्याच्या एका बाजूला पार्किंगची व्यवस्था केली आहे. बापट कॅम्पमध्ये प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर पटांगण, ओम कॉम्प्लेक्ससमोर आणि राजर्षी छत्रपती शाहू सांस्कृतिक परिसर, तसेच पापाची तिकटी येथे जाणाऱ्या वाहनांसाठी गंगावेश परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.