Kolhapur Ganeshotsav : गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी! आता मिरवणुकीसाठी असणार 'लकी ड्रॉ'; शिस्तीसाठी पोलिसांचा निर्णय

मिरवणुकीत कोणत्या क्रमांकावर कोणते मंडळ थांबणार यावरून वाद होतो.
Kolhapur Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsavesakal
Updated on
Summary

मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी हा ड्रॉ यावर्षी आठवड्यापूर्वीच काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आमगन मिरवणुकीत मंडळ कितव्या क्रमांकावर असणार आहे, हे ठरविण्यासाठीचा लकी ड्रॉ ११ सप्टेंबरला निघणार आहे. गणेशोत्सवाचा जल्लोष काय असेल, याची प्रचिती याच मिरवणुकीतून येते.

Kolhapur Ganeshotsav
Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

त्यामुळे येथील मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी हा ड्रॉ यावर्षी आठवड्यापूर्वीच काढण्याचा निर्णय घेतला आहे. राजारामपुरी जनता बझार ते मारुती मंदिर या मुख्य मार्गावर गणेश आमगन मिरवणूक निघते. या मिरवणुकीत कोणत्या क्रमांकावर कोणते मंडळ थांबणार यावरून वाद होतो.

Kolhapur Ganeshotsav
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

यातून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे पूर्वीच मंडळांना त्यांचा क्रमांक मिळावा, या उद्देशाने हा लकी ड्रॉ असणार आहे. यापूर्वी गणेश आमगनाच्या एक किंवा दोनदिवस पूर्वीच हा ड्रॉ निघत होता.

मात्र, या ड्रॉमुळे अधिक सुसुत्रता यावी, ज्या मंडळांना क्रमांक मिळणार नाही, त्यांना मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही. आपले मंडळ मिरवणुकीत असणार की नाही याची माहिती आठवड्यापूर्वीच मिळावी याउद्देशाने हा ड्रॉ लवकर काढण्याचा निर्णय आज पोलिस (Rajarampuri Police Station) निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घेतला आहे.

Kolhapur Ganeshotsav
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली; काँग्रेस-भाजपात गेलेले 'हे' बडे नेते पुन्हा पक्षात परतणार?

राजारामपुरी गणेश आगमन मिरवणुकीत मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम आणि लेसर किरण लागणार नाहीत, याचीही दक्षता आम्ही घेणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही, असाही इशारा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे, तरीही कार्यकर्त्यांनी अति उत्साहात नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.

- अनिल तनपुरे, पोलिस निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.