कोल्हापूर : गोकुळ च्या उलाढालीत ३७८ कोटींची वाढ

काटकसरीतून वर्षात ९ कोटी ६८ लाखांची बचत
गोकुळ
गोकुळsakla
Updated on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघात सत्तांतर झाल्यापासून संघाची वार्षिक उलाढाल २९२९ कोटींपर्यंत झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३७८ कोटींची वाढ आहे. वर्षात म्हैस दूध खरेदी दरात ४ रुपये व गाय दूध दरात २ रुपयांची दूध दरवाढ दिली आहे, तर टॅंकर भाडे कपात, अतिरिक्त कर्मचारी कपात, पशुखाद्य वाहतूक भाडे कपातीसह इतर काटकसरीच्या कारभारातून वर्षात ९ कोटी ६८ लाखांची बचत केल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी आज दिली. गोकुळच्या वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी ताराबाई पार्क येथील कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील ६ हजार ५६४ दूध संस्थांतून वर्षाला ४९ कोटी ९५ लाख ३८ हजार ५१६ लिटर दूध संकलन होत होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५ कोटी ३३ लाख ६ हजार २७५ लिटर्सने वाढ झाली आहे. यावर्षी प्रतिदिन दूध संकलन १३ लाख ६८ हजार लिटर झाले. गतवर्षीच्या तुलनेते प्रतिदिन १ लाख ४६ हजार लिटर दूध वाढले.

या वेळी संचालक अरुण डोंगळे, युवराज पाटील, अजित नरके, किसन चौगले, शशिकांत पाटील, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, अंबरिश घाटगे, बाबासाहेब चौगले उपस्थित होते.

१७ हजार ७१६ टन पशुखाद्य विक्री

पशुखाद्य विक्रीत २०२०-२१ मध्ये १ लाख २० हजार ८८८ टन तर २०२१-२२ मध्ये १ लाख ३८ हजार ६५४ टन पशुखाद्याची विक्री केली गेल्यावर्षीच्या तुलनेते यावर्षी १७ हजार ७१६ टन जादा विक्री झाली आहे.

अशी केली काटकसर

पुणे-मुंबई दूध वाहतूक टॅंकर भाडे कपात : ५ कोटी ८ लाख

अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात : १ कोटी ७८ लाख

महानंद दूध पॅकिंग बचत : ६५ लाख

पशुखाद्य वाहतूक भाडे कपात : १ कोटी ७५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.