कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँकेच्या (rajashree shahu government servants co-op bank) पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू सत्तारुढ पॅनलने पुन्हा एकदा बाजी मारली. पंधरा पैकी त्यांचे १४ उमेदवार मतांच्या प्राधान्य क्रमाने निवडून आले. राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन आघाडीचे प्रकाश पाटील(prakash patil) एकमेव उमेदवार निवडून आले तर छत्रपती शिवाजी महाराज युवा शक्ती विकास पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आज महसूल कर्मचारी संस्थेच्या बहूउद्देशीय सभागृहात मतमोजणी झाली.
गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बँकेतील सत्ताधारी संचालकमंडळातील काही संचालक फुटून त्यांनी पॅनल उभे केले होते. त्यामुळे यंदा निवडणूक तिरंगी झाली. रविवारी (ता.१९) मतदान झाले. एकूण २० हजार ७८८ मतदारांपैकी ९ हजार २४१ मतदारांनी मतदान केले. मतदानाची सरासरी ४४.४५ टक्के झाली. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने याचा फायदा कोणाला ही उत्सुकतेचा विषय होता. आज (ता. २०) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी ४० टेबलवर ८० जण कार्यरत होते. एकूण १३० कर्मचारी होते. सुरुवातीला मतपत्रीकेचे गटवार वर्गिकरण केले. पहिल्यांदा सर्वसाधारण गटातील मते मोजली गेली. सुरुवातीपासूनत सत्ताधारी पॅनलने आघाडी घेतली होती. या गटात सत्ताधाऱ्यांचे दिलीप मिरजे पराभूत झाले त्यांच्या जागी परिवर्तन आघाडीचे प्रकाश पाटील विजयी झाले. ही एक जागा वगळता उर्वरित सर्व गटात सत्तारुढ पॅनलच निवडून आले. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी काम पाहीले. सहाय्यक उपनिबंधक प्रदीप मालगावे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी होते.
विजयाचा जल्लोष
मतमोजणी केंद्राबाहेर सत्तारूढ पॅनलच्या समर्थकांनी जल्लेष केला. विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन गुलालाची उधळण केली. विजयाच्या घोषणा देत त्यांनी आनंद साजरा केला.
पोलिसांनी अडवले
सत्तारूढ पॅनलची विजयी मिरवणूक धैर्यप्रसाद हॉल येथे आली.त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. येथून पुढे मिकरवूणक नेली तर वाहने जप्त करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सर्व जण तेथून पांगले.
लांडगे पुन्हा एकदा पराभूत
गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीमध्ये महादेव लांडगे यंदाही पराभूत झाले. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते सत्तारूढ गटातून उभे राहिले होते. त्याही वेळी ते एकटेच पराभूत झाले. यंदा त्यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडून दुसऱ्या पॅनल मधून निवडणूक लढवली. मात्र यंदाही ते पराभूत झाले.
विजयी उमेदवार कंसात मते - शशिकांत दिनकर तिवले (४, ८४७), रवींद्र वसंतराव पंदारे (४,५२०), विलासराव शंकरराव कुरणे (४,२०४), रमेश गणपती घाटगे (४,१४७), सदानंद वसंतराव घाटगे (४,१००), मधुकर श्रीपती पाटली (४,०८४), रोहित प्रकाश बांदिवडेकर (४,०७६), अतुल गणपतराव जाधव (४,०२३), अजित शंकर पाटील (३,८९७), प्रकाश भीमराव पाटील (३,८५६). महिला प्रतिनिधी हेमा सुभाष पाटील (४,५६४), मनुजा शैलेंद्र रेणके (३,७४६), इतर मागासवर्गिय प्रतिनिधी - संजय सर्जेराव खोत (४,५३६). अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग प्रतिनिधी - किशोर रामचंद्र पोवार - (४,३९२). विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विषेश मागासवर्गीय प्रवर्ग प्रतिनिधी - अरविंद भिमराव आयरे (४,३७२).
कोट
सर्व विरोधकांनी एकत्र येऊन तगडे आव्हान उभे केले. आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र सभासदांनी आमच्या कामाच्या शिदोरीवरच आम्हाला सलग तिसऱ्यांदा विजयी केले. त्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार.
- रवींद्र पंदारे, पॅनल प्रमुख, राजर्षी शाहू सत्तारुढ पॅनल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.