Kolhapur panchganga Flood: पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीवर गेल्याने महापालिकेने शहरातील पूरबाधित भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. मदतीसाठी सहा अग्निशमन केंद्रांबरोबर तीन ठिकाणी रेस्क्यू पथके तैनात केली आहेत.
तिथे अग्निशमन दलाच्या ७२ जवानांबरोबरच स्थानिक संस्थांचे १५ जवान सज्ज आहेत. त्यांच्या मदतीसाठी तीन रेस्क्यू व्हॅन, १२ बोटी, रूग्णवाहिका, ट्रॅक्टर ट्रॉली, पाणी उपशाचे पंपही ठेवले आहेत.
पावसाचा जोर असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढतच आहे. इशारा पातळी गाठल्याने पूरबाधित क्षेत्रावर महापालिका प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. रात्रीत अचानक पावसाचा जोर वाढून पाणी पातळी गतीने वाढल्यास पूरबाधितांना बाहेर काढण्यासाठी त्या-त्या भागातील अग्निशमन दलाच्या केंद्रांना सतर्क केले आहे.
शहरात विविध ठिकाणी सहा अग्निशमन दलाची केंद्र आहेत. त्याशिवाय सासने मैदान, महापालिका मुख्य इमारत, टिंबर मार्केट येथे तीन रेस्क्यू पथके सज्ज केली आहेत. त्यात अधिकाऱ्यांसह आठ ते दहा कर्मचारी आहेत.
आपत्तीची माहिती येईल, तशी सहा केंद्रातील यंत्रणा संबंधित ठिकाणी पोहचणार आहे. तिथे फायर फायटरच्या गाड्या सज्ज असून, तिथे बोटी ठेवल्या आहेत. याशिवाय रेस्क्यू पथकांना पाठवण्यात येणार आहे. यामध्येही बोटी असून, त्याव्यतिरिक्त रूग्णवाहिका, ट्रॅक्टर ट्रॉली, पाणी उपशाचे पंप त्यात ठेवले आहेत.
पाण्याचा वेग वाढला तर अनेक ठिकाणी नागरिकांना हलवण्यासाठी केएमटीशीही चर्चा झाली आहे. नागरिकांची संख्या पाहून काही बस वापरल्या जाणार आहेत.
विभागीय कार्यालय क्षेत्रात निवारा केंद्राची व्यवस्था
चारही विभागीय कार्यालयांनी आपापल्या क्षेत्रातील निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे. आज दिवसभर उपशहर अभियंत्यांनी तेथील सफाई, वीज-पाण्याची व्यवस्था तपासून घेतली. तसेच सुतारवाड्यातील नागरिकांना हलवण्यात येणाऱ्या चित्रदुर्ग मठातील केंद्रात औषधोपचाराचीही व्यवस्था केली आहे.
कळंबा तलाव न भरल्यामुळे...
कळंबा तलाव भरल्यानंतर सांडव्यावरून बाहेर पडणारे पाणी जयंती नाल्यात येते. सध्या नदीत पाणी वाढू लागल्याने जयंती नाल्यातील पाणी वाढू लागले आहे. पण कळंबा तलाव भरला नसल्याचा फायदा नाल्याच्या खोऱ्यात होत आहे. व्हीनस कॉर्नर परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी कुंभार गल्ली येथे पुराचे पाणी तुंबून राहिले आहे.
जर कळंब्यातून पाणी बाहेर पडले असते तर या भागात लवकर पुराचे पाणी शिरले असते. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेबरोबरच विभागीय कार्यालये, आरोग्य विभागही पूरबाधित क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर यंत्रणा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मनीष रणभिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.