Jotiba Chaitra Yatra
Jotiba Chaitra Yatra sakal

Kolhapur : मानाच्या पहिल्या सासनकाठीस २१ तोळे सोन्याचे बसन, पादुका

अडीच लाखांचा रेशमी पोशाखही
Published on

जोतिबा डोंगर : जोतिबा चैत्रयात्रेत सामील होणाऱ्या मानाच्या ९६ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान आहे तो सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी गावचा. या मानाच्या सासनकाठीला तब्बल २१ तोळ्यांचे बसन व पादुका ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून केल्या असून यंदा सोन्याच्या प्रकाशात काठी चमकणार आहे.

तसेच सासनकाठीला अडीच लाख रुपये किंमतीचा शुद्ध रेशीम कपड्याचा पोशाख केला आहे. या निशाणाची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे.

सुमारे ३० ते ३५ मीटर उंचीचे जाड निशान गुलाबी फरारा व तीन चुनी तोरणे याला बांधलेले असते. ही सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचविणे व तोरणे संभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.

पाडळीचे संपूर्ण गावच जोतिबा चैत्र यात्रेसाठी दरवर्षी येते. या गावच्या सासनकाठीचा पहिला क्रमांकाचा मान आहे. पूर्वी प्लेगच्या साथीत या गावातील काही ग्रामस्थांनी सासनकाठी जोतिबा डोंगरावर आणल्यामुळे त्यांना हा मान मिळाल्याची नोंद आहे.

या गावातील लोकांचा पेहराव म्हणजे अंगात पांढरा शर्ट विजार व डोक्याला पांढरी टोपी. कामदा एकादशी या गावातील काही लोक बैलगाड्या घेऊन येतात, तर काही सासनकाठी सोबत पायी येतात. या काठीचे ठिक ठिकाणी भव्य स्वागत होते. नारळांची व पैशांच्या नोटांची तोरणे बांधतात.

Jotiba Chaitra Yatra
Kolhapur : शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार

या गावचे वैशिष्ट्ये म्हणजे गुढीपाडव्यानंतर एक महिना पूर्ण गाव शाकाहारी होते. तसेच येथे पायपीट उपवास करण्याची परंपरा आहे. हा उपवास म्हणजे केवळ पीठ आणि पाणी पिणे ते ही सलग चार दिवस. यात्रेसाठी डोंगरावर येण्यासाठी त्यांची बैठक होते. त्यात सर्व नियोजन करण्यात येते. पूर्ण गाव यात्रेपूर्वी सासनकाठी सजविण्यासाठी एका ठिकाणी येते. दरवर्षी ही काठी भव्य मिरवणुकीने डोलत डोंगरावर येते.

आमच्या पाडळी गावची सासनकाठी मानाची असून तिला डोंगरावर पहिल्या क्रमांकाचा मान आहे. काठीला आम्ही ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २१ तोळे सोन्याची बसण व पादुका केल्या असून अडीच लाख रुपये किंमतीचा शुद्ध रेशीम कपड्याचा पोशाख केला आहे. आम्ही डोंगराकडे येण्याची पूर्ण तयारी केली आहे.

- रवींद्र ढाणे, अध्यक्ष ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट पाडळी, जि. सातारा

Jotiba Chaitra Yatra
Kolhapur : ‘ईझी कर्ज’ ‘ईझी बदनामी’ ; ब्लॅकमेलिंग सुरू होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.