Kolhapur Landslide: 450 गावांत भूस्खलन

Kolhapur Landslide: 450 गावांत भूस्खलन
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात मुसळधार पावसाने एकूण ४५० गावांमध्ये भूस्खलन (Landslide) झाले असून, यामध्ये पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार १८९ हेक्टर जमीन भूस्खलनामुळे बाधित झाली आहे. यामध्ये ५६४ हेक्टर शेत जमीन, तर ६२५ हेक्टर बिगरशेती असणाऱ्या जमिनीचे नुकसान झाले आहे. साधारण साडेदहा हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागले. केवळ चार दिवसांत सरासरी सुमारे ४५० मिलिमीटर पाऊस झाला असून, एकाच दिवसात २१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी पावसाने शिरोळचा (Shirol)अपवाद वगळता जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यांत भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी भूस्खलनाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. Kolhapur-Karveer-Kagal-Gaganbavda-shahuwadi-panhala-aajra-450-Village-Landslide-Flood-News-akb84

करवीर

गावे- २८

जमीन नुकसान-१०

शेती नुकसान-२०

एकूण नुकसान-३८

कागल

गावे- ४८

जमीन नुकसान-४७.२५

शेती नुकसान-६.५

एकूण नुकसान-५३.३०

राधानगरी

गावे-४६

जमीन नुकसान-२३१

शेती नुकसान-६९

एकूण नुकसान-३००

गगनबावडा

गावे-६

जमीन नुकसान-१०

शेती नुकसान-५

एकूण नुकसान-१५

हातकणंगले

गावे-९

जमीन नुकसान-१

शिरोळ

माहिती अद्याप उपलब्ध नाही

शाहूवाडी

गावे-९७

जमीन नुकसान-८७

शेती नुकसान-१५०

पन्हाळा

गावे-१०२

जमीन नुकसान-२२५

शेती नुकसान-२००

एकूण नुकसान-४२५

गडहिंग्लज

गावे-१०

जमीन नुकसान-१.५

शेती नुकसान-०.५

आजरा

गावे- ४४

जमीन नुकसान-२

शेती नुकसान-२२

भुदरगड

गावे-५०

शेती नुकसान-३०

जमीन नुकसान-२

चंदगड

गावे- १०

शेती नुकसान-४०

जमीन नुकसान-२

(नुकसानीचे आकडे हेक्टरमध्ये)

जिल्ह्यात या वर्षीच्या पावसात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. आजपर्यंतच्या पंचनाम्यात ४५० गावांतील माहिती पुढे आली आहे. अद्यापही पंचनामे सुरू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी साडेदहा हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहचलो आहे.

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.