Tourism break : प्रवासी सुविधेअभावी पर्यटनास ‘ब्रेक’

जिल्हा प्रशासनाची उदासीनता; सफर घडविणारी यंत्रणा हवी सक्षम
Tourism News
Tourism Newsesakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्य बिंदूपासून चारही दिशांना जवळपास ७० किलोमीटर अंतराच्या परिसरात शेकडो निसर्गरम्य, डोंगरी, जंगली, पुरातन, धार्मिक, सांस्कृतिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. यातील काही ठिकाणे ‘आडवाटेचे कोल्हापूर’ या पर्यटन उपक्रमातून पर्यटकांसमोर आणली. मात्र पुढे सत्ता बदलली आणि चांगल्या उपक्रमाला खीळ बसली. अशी पर्यटनस्थळे पाहण्याची उत्सुकता घेऊन देशभरातील पर्यटक कोल्हापुरात येतात. मात्र त्यांना कोल्हापुरी ठिकाणांची सफर घडवणारी जिल्ह्यातील सक्षम प्रवासी सुविधा कुचकामी ठरली. पर्यटनपूरक प्रवासी सेवा सक्षम केल्यास पर्यटकांचा मुक्काम व उलाढाल वाढेल. अनेकांना रोजगारांचे साधन मिळेल.

गोवा राज्य पर्यटनावर चालते. एक दिवस दक्षिण गोवा, दुसरा दिवस उत्तर गोवा बघायचा. एका दिवसासाठी पाचशे रुपये मोजावे लागतात. यात जवळपास तीस किमी अंतरातील पर्यटनस्थळे दाखवली जातात. त्याला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. याच धर्तीवर कोल्हापुरात अशी सोय करता येणे शक्य आहे.

वीस वर्षांपूर्वी महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘कोल्हापूर दर्शन’ बस चालवली. त्याला प्रतिसाद होता मात्र एमटीडीसीचे कार्यालय पुण्यात गेले, बसचे संयोजन बिघडले, प्रतिसाद नाही म्हणून सेवा बंद झाली. दहा वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने ‘कोल्हापूर दर्शन बस’ सुरू केली.

बस स्थानकावर सकाळी आठ वाजता कोणी पर्यटक आले तरच त्यांनाच घेऊन पर्यटन सफर घडवली. उशिरा येणाऱ्यांची बस चुकते असा प्रचार झाला. प्रतिसाद थंडावलाही सुविधा एसटीने बंद केली. काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांना स्थानिक भाडे कमी मिळते म्हणून त्यांनीही व्यवसाय बंद केले. खासगी आराम बसचा पर्याय आहे; मात्र बस गाड्या मोठ्या आहेत पन्नास प्रवासी एकावेळी मिळत नाही म्हणून त्यांनीही या विषयाकडे पाठ फिरवली. परिणामी कोल्हापूर बघण्यासाठी प्रवासी सुविधेची कमतरता ठळक झाली.

वास्तविक लोक फिरायला येतात. त्यांना आरामशीर सुविधा हव्या असतात. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर वीस आसण क्षमतेच्या मिनी बस, आराम आसण व्यवस्था, एसी गाड्या आणि ज्या हॉटेल, यात्री निवासांमध्ये पर्यटक उतरले. तेथूनच त्यांना घ्यावे. फिरवून आणून तेथेच सोडावे, अशी सुविधा आवश्यक आहे मात्र तशी सेवा बस चालक व हॉटेल मालक यांच्या समन्वयातून देता येणे शक्य आहे.

मात्र प्रवासी सेवा देणाऱ्या सर्वच घटकांची तोंड एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्यांना एकत्र आणून सेवा देण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. परिणामी पर्यटक येतात, जातात. एवढ्यावर समाधान माणण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.