स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते, राजकारणाच्या माध्यमातून नेतृत्व देताना, सहकार चळवळीतून ‘जनता बाजार’ आणि पंचगंगा साखर कारखान्याचे संस्थापक देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा पुतळा समितीच्या वतीने राजारामपुरी येथील ‘जनता बाजार’समोरच्या बागेमध्ये सिग्नलजवळ बसवण्यात आला आहे.
रत्नाप्पाण्णा कुंभार भारताच्या घटना मसुदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत सहा वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी हा पुतळा उभारला गेला.
या पुतळ्यामध्ये अण्णा वापरत होते, त्या विशिष्ट पद्धतीचे पायघोळ धोतर, अंगावर पूर्ण बाह्यांचा नेहरू कुर्ता असून, खांद्यावर नेहमीप्रमाणे शाल दर्शवली आहे. डावा हात सहजतेने खाली सोडलेला, तर उजवा हात अभिवादनासाठी वर उचलला आहे.
डोक्यावर गांधी टोपी दर्शवताना मध्यम उठावात काम करत चेहऱ्यावर करारी भाव शिल्पकार एस. बी. परदेशी यांनी साकारले आहेत. संगमरवरी पेडस्टलवर असलेल्या या पंचधातूमधील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण २७ सप्टेंबर २००२ रोजी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.