Kolhapur : ठरलं! लोकसभेसाठी कोल्हापुरातून 'हा' तगडा उमेदवार उतरणार रिंगणात; NCP च्या बैठकीत एकमत

पुढच्यावर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू आहेत.
LokSabha Election Hasan Mushrif Jayant Patil
LokSabha Election Hasan Mushrif Jayant Patilesakal
Updated on
Summary

हातकणंगले मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास या मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना रिंगणात उतरण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची आघाडी झाली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हेच राष्ट्रवादीकडून योग्य उमेदवार असल्याचे एकमत काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. दरम्यान, बैठकीला उपस्थित विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अवस्थेवरून नेत्यांचीही चांगलीच झाडाझडती घेतल्याचे समजते. महापालिका, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या ढासळलेल्या प्रगतीबाबत त्यांनी खडे बोल सुनावल्याचे समजते. यापूर्वीचा अनुभव पाहता उसना उमेदवार कोणत्याही परिस्थितीत देऊ नये, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.

LokSabha Election Hasan Mushrif Jayant Patil
Solapur : यल्लम्मा, नाऊ यान पाप माडीद्याऊ..; आईच्या टाहोनं गहिवरलं गाव, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार

पुढच्यावर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघनिहाय चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत काल झाली. बैठकीला श्री. मुश्रीफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, मानसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते.

यापूर्वी (Kolhapur Lok Sabha Constituency) छत्रपती संभाजीराजे व खासदार धनंजय महाडिक यांना पक्षाने उमेदवारी दिली, पण त्यांच्याकडून पक्ष वाढीसाठी काही फायदा तर झालाच नाही, पण ते दोघेही नंतर पक्षापासून दूर गेले. हा अनुभव पाहता उसना उमेदवार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, तसा प्रयत्नही न करण्याची मागणी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी या बैठकीत केली. याशिवाय या बैठकीत उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्यासह अन्य काही पर्यायी नावांवरही चर्चा झाली.

LokSabha Election Hasan Mushrif Jayant Patil
Jaysingpur : आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, 150 जणांवर गुन्हा

मुश्रीफ यांना अडचण असल्यास के. पी. पाटील यांनाच रिंगणात उतरावे लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे भाषण सुरू असताना ए. वाय.- के. पी. यांच्यातील वाद मिटवून ए. वाय. यांनाच लोकसभेसाठी उतरावे, अशी टिप्पणीही श्री. पवार यांनी केली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड आदी उपस्थित होते.

LokSabha Election Hasan Mushrif Jayant Patil
Prithviraj Chavan : 'पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढलाय, हे आता लोकांच्या लक्षात आलंय'

..आणि हास्याचे फवारे उडाले

बैठकीत आमदार राजेश पाटील यांनी लोकसभेसाठी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे हेही योग्य असल्याचे सांगितले. त्यावर ते आपल्या पक्षात तरी आहेत का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच बैठकीत हास्याचे फवारे उडाले. अलीकडेच श्री. पवार यांनी श्री. डोंगळे यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

..तर जयंत पाटील

कोल्हापूर व हातकणंगले असे दोन मतदारसंघ जिल्ह्यात येतात. हातकणंगले मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास या मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना रिंगणात उतरण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या नावावरही चर्चा झाली.

LokSabha Election Hasan Mushrif Jayant Patil
Kolhapur : येत्या तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवलं जाण्याची शंका; सतेज पाटलांनी व्यक्त केली भीती

तुमच्या सोयीचे बघू नका

बैठकीत कोल्हापुरातून आपल्याकडे एक उमेदवार आहे, पण सध्या ते शिवसेनेते आहेत, त्यांना पक्षात घेऊन उमेदवार देता येईल, असा सूर श्री. मुश्रीफ यांनी आळवला. त्यांच्या बोलण्याचा रोख माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुमच्या सोयीचे राजकारण बघू नका, पक्षाची गरज बघा, असे सुनावल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()