Kolhapur Lok Sabha 2024: राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेत पडलेली फूट, निवडून आणण्यापेक्षा कुणाला पराभूत करायचे, यासाठी होणारे मतदान हा इतिहास पाहता कोल्हापूर मतदारसंघात महायुतीला जागा राखण्याचेच खरे आव्हान असेल. सद्यःस्थितीत ही जागा महायुतीत शिवसेनेकडे आहे. खासदार प्रा. संजय मंडलिकच महायुतीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसला मिळाली आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे आणि संपर्क व प्रचाराच्या पातळीवर आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
प्रा.संजय मंडलिक (शिवसेना) विजयी मते : ७,४९,०८५
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) मते : ४,७८,५१७
डॉ. अरुणा माळी (वंचित बहुजन आघाडी) मते : ६३,४३९
संदीप संकपाळ (अपक्ष) मते : ५,९५५
विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,७०,५६८
२००४ : राष्ट्रवादी
२००९ : अपक्ष
२०१४ : राष्ट्रवादी
२०१९ : शिवसेना
महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी जाहीर. प्रचाराला प्रारंभ
जिल्ह्यातील मोठे राजकीय गट महायुतीकडे राहण्याची शक्यता
महाविकास आघाडीचा सर्व घटकांची मोट बांधून नियोजनबद्ध प्रचारावर भर
कोल्हापूरची अस्मिता म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी तर महायुतीकडून मोदींचे काम व हिंदुत्वावर दिला जाणार भर
विविध विकासकामांना निधी मंजूर; पण बहुतांश कामे सुरू नाहीत.
औद्योगिक वसाहती नाहीत. रेल्वेची कनेक्टिव्हिटी कमी. कोकण रेल्वे प्रलंबितच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.