अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळा; अखेरच्या दिवशी किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत 

kolhapur mahalaxmi kirnotsav 2021
kolhapur mahalaxmi kirnotsav 2021
Updated on

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आज मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोचली. या किरणोत्सवात ढगांचा अडथळा आणि हवेतील प्रदूषणामुळे सूर्यकिरणांचा अपेक्षित आविष्कार अनुभवता आला नाही. मात्र, अखेरच्या दिवशी किरणांची तीव्रता अधिक राहिली. 

दरम्यान, सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी किरणे कटांजनापर्यंत पोचली आणि त्यानंतर तीन मिनिटांनी मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोचली. सायंकाळी सहा वाजून 18 मिनिटांनी ती मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोचली आणि डावीकडे लुप्त झाली, असे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. 

मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव सोहळ्याच्या तारखा बदलत असल्याचे स्पष्ट होत असले तरी आणखी परिपूर्ण अभ्यासानंतरच याबाबतची पुढील कार्यवाही होणार आहे. दक्षिणायनातील किरणोत्सव नियोजित तारखांच्या दोन दिवस पुढे तर उत्तरायणातील किरणोत्सव दोन दिवस अगोदर होत असल्याचे आजवरच्या अभ्यास आणि नोंदीवरून स्पष्ट झाले आहे; मात्र आगामी आणखी काही सोहळ्यातील नोंदी घेऊनच पुढे तारखांबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

मंदिरात 9, 10 व 11 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी, 1 व 2 फेब्रुवारी असा वर्षातून दोनदा किरणोत्सवाचा सोहळा होतो. मात्र, किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांमुळे अनेक वर्षे किरणोत्सवाचा सोहळा पूर्ण क्षमतेने झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने किरणोत्सव अभ्यास समिती नेमून त्यात तज्ज्ञांचा सहभाग घेतला आहे. अभ्यास समितीने दोन वर्षातील किरणोत्सवाच्या नोंदी ठेवल्या असून देवस्थान समितीने जानेवारी 2019 पासून पाच दिवसांच्या किरणोत्सवाला प्रारंभ केला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.