Kolhapur News: बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय नेते मौनात, तर शिवसेना जोमात

Latest Marathi News: तेच ते चेहरे पुन्हा निवडणूक तयारीत
Kolhapur Market Committee
Kolhapur Market Committeesakal
Updated on

Kolhapur News : गृहपाठ झाला, तोंडी परीक्षा दिली, ऐनवेळी लेखी परीक्षा पुढे ढकलली, असे दोन वेळा झाल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूड गेला, अशी अवस्था बाजार समितीच्या निवडणुकीची झाली आहे.

या निवडणुकीसाठी ‘तयारी’ केलेल्या इच्छुकांची घालमेल, पक्षीय नेते आपल्याच व्यापात, शेतकरी उमेदवारीचा पत्ता काटला, अशा अवस्थेत बाजार समिती निवडणुकीत तेच ते चेहरे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे.(Latest Marathi News)

गेल्या २० वर्षांत शेती उत्पन्न बाजार समितीवर कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना-भाजप, जनसुराज्य पक्षाचे प्रत्येक संचालक मंडळात दोन-तीन सदस्य जरूर होते. मात्र, बहुतांशी कारभार राष्‍ट्रवादीच्या हाती राहिला. यात दोनवेळा अशासकीय प्रशासक मंडळ आले. त्यातही राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व राहिले.(Marathi Tajya Batmya)

मागील संचालकांची मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी बाजार समितीची निवडणूक लागली. तेव्हा प्रशासक मंडळातील काही सदस्य व जुन्या संचालक मंडळातील सदस्यांनी आपापल्या पक्षीय नेत्यांची मनधरणी करीत बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले.

जिल्ह्यातील शेतीमाल बाजाराचा अभ्‍यास करणारे अनेकजण आहेत. मात्र, त्यांचे राजकीय वजन नसल्याने ते निवडणुकीसाठी इच्छूक नाहीत. ज्यांचे राजकीय वजन आहे त्यांचा अभ्यास असो अथवा नसो, पक्षाचा व नेत्याच्या जवळचा म्हणून गेल्या वर्षभरापासून ते इच्छूक असल्याचे सांगत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

याचवेळी बाजार समिती निवडणुकीत झालेला तांत्रिक पेच, त्यातून प्रकरण न्यायालयात गेले. या साऱ्या प्रक्रियेत पाच महिने निवडणुका पुढे ढकलल्याने अनेकांचा हिरमोड झाला. अभ्यासू उमेदवार शोधण्याचा प्रयत्नच राहून गेला.

Kolhapur Market Committee
Kolhapur News: महिलांसाठीच्या सवलत योजनेत राज्यात कोल्हापूर ‘नंबर वन’

गेल्या पाच महिन्यांत परिस्थिती इतकी बदलली की, शिवसेनेचे दोन गट पडले. राज्यात सत्ता बदलली, राष्‍ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडी प्रकरण लागले. आमदार सतेज पाटील वरिष्‍ठ पातळीवर राजकीय घडामोडीत गुंतले.

यात सत्ताधारी गटातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मात्र बाजार समिती निवडणुकीत लक्ष घातले. व्यापारी मतदार यादी पेचावरून त्यांनीही पाठपुरावा सुरू केला.

यानिमित्ताने त्यांच्या जवळ गेलेले बाजार समितीचे जुने संचालक उमेदवार सेनेचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होतील अशी चिन्हे आहेत.

Kolhapur Market Committee
Kolhapur News: महिलांसाठीच्या सवलत योजनेत राज्यात कोल्हापूर ‘नंबर वन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.