Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीचे चित्र स्पष्ट; १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात

महिला, दुर्बल, भटक्या गटात दुरंगी लढत
Kolhapur Market Committee
Kolhapur Market Committeesakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून आज तब्बल ५८५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीनंतर समितीच्या १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उतरले असून, महिला प्रतिनिधी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व भटक्या विमुक्त गटात दुरंगी लढतीचे तर अन्य गटात बहुरंगी लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले.

दरम्यान, रिंगणातील उमेदवारांना उद्या (२१) चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान असून, मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी यांना उद्याच दुपारी बारा वाजता शाहू सांस्कृतिक भवनमध्ये पहिले प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बाजार समितीसाठी ६६० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. काल (ता. १९) दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना मिळून राजर्षी शाहू आघाडीच्या पॅनेलची घोषणा झाली. यात डावललेल्या उमेदवारांना घेऊन ठाकरे, शिंदे गटासह राष्ट्रवादीतील बंडखोर गटाच्यावतीने शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीच्या पॅनेलची घोषणा करण्यात आली.

दोन्ही पॅनेलमध्ये स्थान मिळालेल्या ३६ उमेदवारांसह अपक्ष १५ जणांनी अर्ज कायम ठेवून इतरांनी अर्ज माघार घेतली. विकास संस्था गटातील ११, ग्रामपंचायत गटातील चार, अडते व्यापारी गटातील दोन व हमाल, मापाडी गटातील एक अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

गटनिहाय रिंगणातील उमेदवार (कंसात निवडून द्यायचे उमेदवार)

विकास संस्था गट (एकुण जागा ११) - सर्वसाधारण- १७ (७), महिला प्रतिनिधी - ४ (२), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट - ३ (१), भटक्या विमुक्त - २ (१)

ग्रामपंचायत गट - ४ - सर्वसाधारण - ५ (२), अनुसुचित जाती गट - ३ (१), आडते व्यापारी - २ (८), हमाल-मापाडी - ७ (१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.