कोल्हापूर : वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची चोरी

गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.
कोल्हापूर : वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची चोरी
कोल्हापूर : वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची चोरी sakal
Updated on

कोल्हापूर : शिनोली (ता. चंदगड) येथील श्रीराम स्टील उच्चदाब वीजजोडणीधारक ग्राहकाने वीज मीटरमध्ये फेरफार करून ३ लाख ४० हजार ८०० युनिटची वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची रक्कम ६३ लाख ६९ हजार २५० रूपये इतकी होते. या प्रकरणी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.

महावितरणच्या भरारी पथकाने शिनोली (ता.चंदगड) येथील श्रीराम स्टील या उच्चदाब वीज जोडणी धारक (७५० केव्हीए मंजूर जोडभार) ग्राहकाच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. तपासणीत वीज मीटरच्या सीटी व पीटी टर्मिनल बसविण्याचे ठिकाणी मीटर फुटला असल्याचे दिसून आले. मीटर फुटलेल्या ठिकाणी चिकट द्रव्याच्या साह्याने फुटलेले तुकडे पुन्हा चिकटवले असल्याच्या खुणा दिसून आल्या. मीटर तपासणीसाठी ग्राहक व पंचांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात आले.

कोल्हापूर : वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची चोरी
महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

मीटरची ग्राहक व पंचासमक्ष कोल्हापूरातील बापट कॅम्प स्थित मीटर तपासणी प्रयोग शाळेत तपासणी केली. त्यात मालक प्रल्हाद जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे रिमोट देऊन रिमोटच्या साह्याने मीटरचा डिस्प्ले बंद-चालू करत असल्याचे सांगितले. ते मीटर तपासले असता डिस्प्ले बंद पडून हे वीजमीटर १०० टक्के मंद गती होऊन वीजेच्या वापराची नोंद मीटरमध्ये होत नसल्याचे दिसून आले. या पद्धतीने ग्राहकाने वीज चोरीच्या हेतूने वीजमीटरमध्ये छेडछाड करुन रिमोट वापरला असल्याचे निदर्शनास आले. वीजचोरीचा कालावधी ५ महिने १२ दिवस इतका निर्धारीत केला असून, या कालावधीत ३ लाख ४० हजार ८०० युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी श्रीमती वर्षा जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी व निखिल कांबळे यांनी ही मोहीम यशस्वी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.