कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्ते बंद झाले असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर धुवाँधार पाऊस (Kolhapur Monsoon Rain) पडल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढून ७.३६ टीएमसी झाला होता. पंचगंगेची पातळी रात्री एक वाजता ४१.९ फूट इतकी होती. दरम्यान, बावडा-शिये मार्ग रात्री उशिरा बंद करण्यात आला.
कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्ते बंद झाले असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे. राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग आहे. काळम्मवाडी, तुळशी आणि वारणा धरणाच्या क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक आहे. जिल्ह्यामध्ये तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी आता नागरी वस्तीमध्ये घुसले आहे.
शहरात सुतारवाडा, महावीर गार्डन पिछाडीस परिसरात जयंती नाल्याचे पाणी आले. उलपे मळा, शुक्रवार पेठ, बापट कॅम्प या भागात पंचगंगेचे पाणी आले आहे. त्यामुळे सुतारवाड्यातील आठ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही गावांमधील नागरिकांना स्थलांतराची सूचना प्रशासनाने केली आहे. आपत्ती विभागाने एनडीआरएफच्या तुकडीही तैनात ठेवण्यात आली आहे.
तुळशी - २.६२
वारणा - २८.१५
दूधगंगा - १६.७२
कासारी - २.०४
कडवी - २.५२
कुंभी - १.८९
पाटगाव - ३.२६
चिकोत्रा - ०.९०
चित्री - १.८२
जंगमहट्टी - १.२२
घटप्रभा - १.५६
जांबरे - ०.८२
आंबेआहोळ - १.२४
सर्फनाला - ०.४८
कोदे - ०.२१
वारणा धरणातून ३८०० क्युसेक विसर्ग सुरू
कसबा बावडा ते शिये मार्गावर पुराचे पाणी
पुणे-बंगळूर महामार्गावर पंचगंगा पुलाजवळील सेवा रस्त्यावर पाणी
इंगळी (ता. हातकणंगले) येथील सहा कुटुंबांचे स्थलांतर
इचलकरंजी - हुपरी - कर्नाटक-मार्ग बंद
हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूल पाण्याखाली
कुरुंदवाड-नांदणी व दानोळी- कोथळी मार्ग पाण्याखाली
दत्तवाड-एकसंबा, मलिकवाड, घोसरवाड - सदलगा मार्ग पाण्याखाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.