Kolhapur Flood Update: कोल्हापुरात पूरस्थिती! पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज खुले होणार?

Kolhapur Panchganga Flood: पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आल्याने पंचगंगेची (Panchganga River) पातळी काल रात्री नऊपर्यंत सुमारे अकरा तास स्थिर होती.
Panchganga River Water Storage
Panchganga River Water Storageesakal
Updated on
Summary

आलमट्टी धरणात (Almatti Dam) ७१.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून आज (ता. २६) सकाळी नऊपासून विसर्ग १५ हजारवरून ३० हजार क्युसेक करण्यात येणार आहे.

Kolhapur Rain News : पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आल्याने पंचगंगेची (Panchganga River) पातळी काल रात्री नऊपर्यंत सुमारे अकरा तास स्थिर होती. ती रात्री नऊ वाजता ४०.५ तर रात्री बारा वाजता ४०.६ फूट होती. दुसरीकडे राधानगरी धरणात ८.१९ टीएमसी साठा झाला असून, धरण ९८ टक्के भरले आहे.

Panchganga River Water Storage
Sindhudurg Rain : सह्याद्री पट्ट्यात मुसळधार; धबधब्याखाली अडकलेल्या 24 पर्यटकांची पोलिसांनी 'अशी' केली सुटका

आज (ता. २६) सकाळपर्यंत या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होतील, असा अंदाज जलसंपदा विभागाने रात्री उशिरा व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून दिवसभरात शहर आणि ग्रामीण भागातील २९ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली आहेत.

आलमट्टी धरणात (Almatti Dam) ७१.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून आज (ता. २६) सकाळी नऊपासून विसर्ग १५ हजारवरून ३० हजार क्युसेक करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राधानगरी धरणामधून विसर्ग होऊन पंचगंगा नदीची पाणीपातळी आठ फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली.

Panchganga River Water Storage
Kolhapur Flood : महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसाठी तातडीचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

त्यांनी पूरबाधित क्षेत्रातीतल कुटुंबांना सर्व साहित्य बांधून स्थलांतरास सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. सकाळपासून शहर आणि ग्रामीण भागातील पूरबाधित कुटुंबाचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दिवसभर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी भीतीच्या छायेतच दिवस काढला. शहरातील जामदार क्लब आणि सुतारवाडा येथील नऊ कुटुंबातील ३३ जणांचे चित्रदुर्गमठात स्थलांतर केले आहे.

ग्रामीण भागातील २० कुटुंबातील ९३ लोकांचे आणि ३० जनावरांचे स्थलांतरण केले आहे. कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी मार्ग बंद झाल्याने या मार्गावरून कोकणात जाणारी सर्व वाहतूक रोखण्यात आली आहे.

२४ पैकी ११ राज्य मार्ग तर १२२ पैकी २४ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ३५ रस्ते बंद आहेत. ग्रामीण भागातील पाच पक्क्या घरांची पडझड झाली.

एकूण पक्की १६ तर कच्ची ५५ घरे अंशत: पडली आहेत. ५ गोठे बाधित आहेत. एक दुधाळ म्हैस तर दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. तांदुळवाडी, बोरवडे पैकी मराठवाडी (ता. पन्हाळा) आणि शेणवडे (ता. भुदरगड) येथील २० कुटुंबांनी ९३ लोक आणि १५ जनावरांचे स्थलांतर केले आहे. या सर्व कुटुंबाचे त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

Panchganga River Water Storage
Chandoli Dam : पावसाचा जोर वाढल्यास धरणातून केंव्हा ही पाणी सोडण्यात येणार; वारणाकाठी सावधानतेचा इशारा

पूरस्थिती झाल्यास निवारा केंद्र

करवीर - १२०, गगनबावडा २, शाहूवाडी २७, आजरा १५, गडहिंग्लज २६, चंदगड ३०, शिरोळ ५०, हातकणंगले ३९, पन्हाळा ४१, राधानगरी २, भुदरगड २३, कागल ४०, इचलकरंजी ६३.

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) विसर्ग (क्युसेक)

  • तुळशी ३.४७ १.७४ नाही

  • वारणा ३४.३९ २७.२३ ८९७

  • दूधगंगा २५.३९ १३.४९ नाही

  • कासारी २.७७ २.२१ १०००

  • कडवी २.५१ २.२२ १५०

  • कुंभी २.७१ २.२१ ७००

  • पाटगाव ३.७१ २.५७ नाही

  • चिकोत्रा १.५२ ०.८१ नाही

  • चित्री १.८८ १.२८ नाही

  • जंगमहट्टी १.२२ ०.८७ नाही

  • घटप्रभा १.५६ १.५६ ४४५३

  • जांबरे ०.८१ ०.८२ १४८७

  • आंबेओहोळ १.२४ ०.९८ नाही

Panchganga River Water Storage
Monsoon Update: दिवसभरात राज्यातील पावसाची स्थिती कशी होती? जाणून घ्या एका क्लीकवर

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) विसर्ग (क्युसेक)

  • राधानगरी ८.३६ ८.१९ १५५०

  • कोयना १०५ ५८.८१ १०५०

  • आलमट्टी १२३ ७१.८ १५,०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.