कोल्हापूर : भाजपमध्ये अंतर्गत बदलांच्या हालचाली

चौघांवर होणार कारवाई, काही कार्यकर्त्यांना मिळणार नवी जबाबदारी
 भाजप
भाजपsakal
Updated on

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महानगर कार्यकारिणीत बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही कार्यकर्त्यांना नवी जबाबदारी मिळणार असून, चार पदाधिकाऱ्यांवर कारवाई होईल. यात एका महिला पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभेत भाजपचा जरी पराभव झाला तरी मिळालेल्या मताची बेगमी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. त्यातच धनंजय महाडिक यांना राज्यसभेची खासदारकी मिळाल्याने जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाले आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पक्षातील सर्व कार्यकर्ते झोकून देऊन प्रचारात उतरले होते. मात्र, याला काही मोजक्या कार्यकर्त्यांचा अपवाद होता. त्यांनी या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला आहे. या कार्यकर्त्यांबद्दल पक्षातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे यांच्याबाबत निर्णय घेतला जावा अशी मागणी सातत्याने होत होती. गेल्या महिन्यात पक्षाचे प्रदेशातील वरिष्ठ पदाधिकारी कोल्हापुरात आले होते.

ते पोटनिवडणुकीतही सक्रिय होते. त्यामुळे येथील पक्ष संघटनेची कल्पना त्यांना होती. त्यांनी जिल्हा कार्याकरणी आणि इतर प्रमूख कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संवाद साधून एक अहवाल बनवला. तो त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. यात कार्यकर्त्यांची भावना, तक्रारी यांचा समावेश आहे. या अहवालानुसार लवकरच चार पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर नजिकच्या काळात ही कारवाई केली जाईल. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटनेची नव्याने मांडणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीकोनातून नवे प्रवेशही होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिक्कोडे हे निर्णय घेणार असून, लवकरच याबाबतची कार्यवाही होणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात

भारतीय जनता पक्ष हा राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढविणार आहे. त्यासाठी पुण्यात व्यापक बैठक नुकतीच झाली. यात आठ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याचे निश्चित केले आहे. यात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचा समावेश आहे. कोल्हापूर मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि जिल्हा संघटन सरचिटणीस (ग्रामीण) नाथाजी पाटील यांच्याकडे देण्यात आली; तर हातगणंगले मतदारसंघाची जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोपवली आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()