कोल्हापूर : पोलिस भरतीत ‘NCC’ चे गुण ग्राह्य

इच्छुक तरुणांत आशेचा किरण लेखी शारीरिक परीक्षा मिळून २०० गुणांची
NCC Marks | Police Bharti News
NCC Marks | Police Bharti Newssaka media
Updated on

सरूड: ‘एनसीसी’ प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र धारण केलेल्या आणि पोलिस भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यापुढे एनसीसी प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरणार असल्याने ‘एनसीसी’ कॅडेट्सना नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

या संदर्भातले महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस शिपाई होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिस भरतीसाठी गावोगावी रानामाळात मुले घाम गाळताना दिसतात. सुधारित निर्णयाने एनसीसी प्रमाणपत्र प्राप्त कॅडेट्च्या पंखांना अधिक बळ मिळणार आहे.

राष्ट्रीय छत्रसेना (एनसीसी)चे ''क''(सी) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणांच्या ५ टक्के, एनसीसीचे ''ब''(बी) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणांच्या ३ टक्के तर एनसीसीचे ''अ''(ए) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणाच्या २ टक्के अधिकचे बोनस गुण अंतिम निवडीवेळी ग्राह्य धरले जाणार आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे एनसीसीचे विविध विभाग कार्यरत आहेत.

यात १ महाराष्ट्र बॅटरी,५ महाराष्ट्र, ६ महाराष्ट्र, ५६ महाराष्ट्र कोल्हापूर, १६ महाराष्ट्र सांगली, १९ महाराष्ट्र कराड, २२ महाराष्ट्र सातारा, सैनिक स्कूल सातारा, ५८. महाराष्ट्र सिंधुदुर्ग व २ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी रत्नागिरी यांचा समावेश आहे. बदललेल्या नियमानुसार आता लेखी पहिल्यांदा व नंतर शारीरिक परीक्षा होणार आहे. यापूर्वी शारीरिक अर्थात मैदानी परीक्षा पहिल्यांदा होत होती. दोन्ही परीक्षा मिळून २०० गुणांची असणार आहे. यापैकी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना आता प्रमाणपत्रानुसार बोनस गुण मिळणार आहेत.

१०३ महाविद्यालये २०४ हायस्कूल

कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांतील १०३ महाविद्यालयात, तर २०४ हायस्कूलमध्ये एनसीसीचे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्षी २५०० ते ३००० सी, ३००० ते ४००० बी तर ४००० ते ५००० ए प्रमाणपत्रधारक पाच जिल्ह्यांतून बाहेर पडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.