Kolhapur NCP Sabha : जंगी स्वागत, भव्य रॅली.. कोल्‍हापुरात अजितदादांची सभा होणार रेकॉर्ड ब्रेक; मंत्री हसन मुश्रीफांना विश्‍‍वास

मी अजित पवार गटासोबतच, हसन -किसनची जोडी जिल्ह्यात प्रसिद्ध - के. पी. पाटील
Kolhapur NCP Sabha Ajit Pawar
Kolhapur NCP Sabha Ajit Pawaresakal
Updated on
Summary

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्‍ह्यात जाहीर सभेसाठी येत आहेत. त्यामुळे शहरात त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहेत.

कोल्‍हापूर : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची १० सप्‍टेंबरची उत्तरदायित्‍व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल’, असा विश्‍‍वास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्‍त केला. कोणत्याही सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी सभेचे आयोजन नसून, जिल्‍ह्यातील प्रलंबित प्रश्‍‍नांवर मार्ग काढणारी ही सभा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

सभेच्या तयारीसाठी बोलावलेल्या राष्‍ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेवून ही सभा यशस्‍वी करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या. मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्‍न झाला. यावेळी आपल्यासह काही प्रमुख नेत्यांनी श्री. पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

Kolhapur NCP Sabha Ajit Pawar
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

या निर्णयाबाबत वेळोवेळी स्‍पष्‍ट माहिती देण्यात आली असून, आपल्यासाठी हा विषय संपला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर श्री. पवार पहिल्यांदाच जिल्‍हा दौऱ्या‍वर येत आहेत. जिल्‍ह्यातील अनेक प्रश्‍‍नांची माहिती त्यांना आहे. थेट पाईपलाईनचा प्रश्‍‍न त्यांनीच मार्गी लावला. तसेच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उच्‍च न्यायालयाचे खंडपीठ असे काही प्रमुख विषय प्रलंबित आहेत. हे विषय मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सभेचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Kolhapur NCP Sabha Ajit Pawar
Kolhapur NCP Sabha Ajit Pawaresakal

आमदार राजेश पाटील यांनीही उत्तरदायित्‍व सभेसाठी मतदारसंघात मेळावे आयोजित केल्याचे सांगितले. मोठ्या संख्येने जिल्‍ह्यातील जनता या मेळाव्याला उपस्‍थित राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. माजी आमदार के.पी.पाटील म्‍हणाले, ‘मी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबतच आहे. हसन -किसनची जोडी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.

Kolhapur NCP Sabha Ajit Pawar
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' अध्यक्षांचा शौमिका महाडिकांवर पलटवार; 'महाडिकांनी फक्त राजकीय हेतूनंच तसं केलंय'

राष्ट्रवादीचे काही कार्यक्रम घेण्यात आले, मात्र त्याचे निमंत्रण नसल्याने उपस्थित नव्हतो. अजित पवार यांना ताकद देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना अगोदर ताकद देणे आवश्यक आहे.’ आदिल फरास यांनीही मनोगत व्यक्‍त केले. बैठकीस जिल्‍हाध्यक्ष ए.वाय.पाटील, भैय्‍या माने, युवराज पाटील, मानसिंग गायकवाड, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदी उपस्‍थित होते.

Kolhapur NCP Sabha Ajit Pawar
Jalna Lathicharge : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; फडणवीसांपासून मंत्री दानवेंपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

रॅली, गावागोवी फलकांनी स्‍वागत

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्‍ह्यात जाहीर सभेसाठी येत आहेत. त्यामुळे शहरात त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहेत. सर्वत्र स्‍वागत कमानी उभारल्या जाणार आहेत. ठिकठिकाणी बॅनर तसेच गावागावातही अशाच पध्‍दतीने बॅनर लावून जंगी स्‍वागत करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

मुंडेंच्या सभेसारखी परिस्‍थिती नको

सभेला येताना कार्यकर्ते आपली वाहने दूर लावतात आणि प्रमुखांची भाषणे झाली की लोक निघून जातात. धनंजय मुंडे यांच्या सभेत मुंडे यांचे भाषण झाल्यानंतर लोक निघून गेले. अशी परिस्‍थिती येणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना मुश्रीफ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.