Kolhapur news : सातेरीच्या डोंगरावर बाराव्या शतकातील, शंभू महादेवाचे मंदिर

कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील सातेरी येथे शंभू महादेवाचे मंदिर आहे.
shiva temple
shiva templesakal
Updated on

Kolhapur news : सातेरीच्या डोंगरावर बाराव्या शतकातील, म्हणजे एक हजार वर्षांपूर्वीच्या शिलाहारांच्या साम्राज्यातले, अखंड पाषाणातील शिव-पार्वतीचे मंदिर आढळून आले. सातेरी महादेव आणि महेचे भैरवनाथ मंदिर या दोन डोंगरांवरील मंदिरांच्या टप्प्यामध्ये असलेल्या संपूर्ण परिसरातील गावांमध्ये विरगळांचे प्रमाण अधिक आढळते.

हे शिलाहारांच्या साम्राज्याचे चिन्ह आहे. कारण शिलाहार आणि यादव यांच्यात जो संघर्ष झाला, त्यामध्ये जे धारातीर्थी पडले त्यांचे स्मारक (शिळा) म्हणून विरगळ तयार करण्यात आली. अशी शेकडो स्मारके कासारी, भोगावती या नद्यांच्या तीरावर वसलेल्या समृद्ध गावांमध्ये आढळून येतात.

कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील सातेरी येथे शंभू महादेवाचे मंदिर आहे. येथील निसर्गसौंदर्य मनाला मोहवून टाकणारे आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढती आहे. पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. अवघड पायवाट असल्यामुळे भाविकांची संख्या कमी असे; पण अलीकडच्या दहा-पंधरा वर्षांत रस्ता झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढली आहे.

shiva temple
Maharashtra Politics : पक्षांतरबंदी कायदा सुधारावा; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

मंदिरात प्रामुख्याने शिवलिंगासह पार्वती व गणेशाचीही मूर्ती कोरलेली आहे. डोंगराच्या पायथ्याशी सातेरी देवीचे मंदिर आहे. पायऱ्यांवरून मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला एक विहीर असून तिची खोली सुमारे ३० ते ४० फूट आहे. या विहिरीत पूर्वीपासूनच पाणी नाही. निसर्गरम्य ठिकाण असल्याने सध्या या ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे.

shiva temple
Credit Card व्दारे Online गाडी बुकिंग करत असाल तर थांबा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!

आख्यायिका

सातेरी टेकडीवरच्या शंभू महादेवाच्या मंदिराखालून एक गुप्त नदी गेलेली आहे, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्या परिसरातील धोंडेवाडी, केकतवाडी, नरगेवाडी, मल्लेवाडी, मांडेवाडी, वाघोबावाडी, शिपेकरवाडी, कारंडेवाडी, बोलोली, विठ्ठलवाडी, स्वयंभूवाडी या गावांना झऱ्यांच्या माध्यमातून पिण्यासाठीच्या पाण्याचा फायदा होतो. अलीकडच्या काळात मंदिर परिसरातील शेतकऱ्यांनी तेथे जाऊन भजन-कीर्तनास सुरुवात केली आहे.

shiva temple
Satara : महापुरुषांची बदनामी करण्‍याचं धाडस होतंच कसं? अशा अपप्रवृत्ती ठेचल्‍याच पाहिजेत; उदयनराजेंचा कोणाला इशारा?

कसे जाल...

कोल्हापूर ते सातेरी अंतर ः २५ किलोमीटर

कोल्हापूर, बालिंगा, पाडळी खुर्द, कोगे फाटा, महे, बीड मार्गे बीडशेड चौकातून गणेशवाडी, धोंडेवाडी ते सातेरी.

shiva temple
Udyan Express:Udyan Express: चालत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकले,मुंबई-पुणे उद्यान एक्स्प्रेसमधील प्रकार..कारण धक्कादायक

या सुविधा हव्यात

पार्किंग व्यवस्था, पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

स्वच्छता ही नागरिकांनी स्वयंशिस्तीनेच करणे गरजेचे. तरुणाईचा वावगा वावर ग्रामस्थांनीच रोखायला हवा.

महाशिवरात्रीच्या काळात तीन दिवस भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप केला जातो. या यात्रेत तीन दिवसांत सुमारे दोन लाख भाविक भेट देतात.

नामदेव पाटील सेवेकरी ग्रामस्थ, वाघोबावाडी

अखंड खडकात मंदिर असून त्याबाबतचे संशोधन होणे आवश्यक आहे. या परिसराचा प्राचीन बाजच कायम राहावा. पर्यावरणीय व पुरातत्त्वीय अवशेषांना बाधा येईल, अशा आधुनिक सुविधा येथे नसाव्यात.

उमाकांत राणिंगा, मंदिर व मूर्ती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.