kolhapur
kolhapur sakal

Kolhapur News : पोलिसांचे बनावट शिक्के करणाऱ्यांना अटक

पोलिसांचे बनावट शिक्के, दाखले तयार केल्याचे उघडतिघांवर गुन्हा; वाहन परवान्यासाठी वापर
Published on

कोल्हापूर - वाहन परवान्यांसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या तिघांनी पोलिसांचे बनावट शिक्के, गहाळ दाखले बनवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महादेव अरुण राऊत (वय ३९, रा. मुळ बेलाटी, ता. उत्तर सोलापूर, सध्या रा. गणेश पार्क, कदमवाडी), शौकत शेख (रा. नागाव) आणि अमर शरद फलके (वय २७, रा. प्लॉट क्रमांक ४, मणेरमाळ, उचगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी या तिघांनी वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स), वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्यावर द्यावयाचे पोलिसांचे दाखले आणि त्यावरील शिक्के बनावट तयार केले. त्याचा वापर करून ते डुप्लिकेट परवाना आणि वाहनांची कागदपत्रे करून द्यायचे. खोट्या दाखल्यांवर खोट्या सह्या आणि शिक्केही खोटेच द्यायचे.

असे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.टोळी असण्याची शक्यता
पोलिसांनी सांगितले, की प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही कर्मचारी सहभागी आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. खोटी कागदपत्रे करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे काय, हाही तपासाचा केंद्रबिंदू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.