Money Lenders Threaten To Women In Kolhapur : कर्ज न फेडल्याने महिलेला अपशब्द वापरत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातून समोर आला आहे.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
एवढेच नव्हे तर, कर्ज वसुलीसाठी महिलेला गुंडांकडून मारहारणही करण्यात आली आहे. या सावकाराने कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू अशी धमकी दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
धमकी देण्यात आलेल्या महिलेनी सावकाराकडून 25 लाखांचे कर्ज घेतलं होतं. त्यावर आता सावकार जबरदस्तीने 85 लाखांची वसुली करण्याचा प्रयत्न करत आहे.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सावकाराच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलांनी पोलीस ठाणे गाठले.
मात्र, येथे महिलेला कागदपत्र सादर करण्या सांगत जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याचे महिलेचे म्हणणं आहे. गुंडांच्या भीतीमुळे महिलेच्या मुलांना घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.